घरमुंबईशेतकरी आंदोलन : शिवसेनेचे बाजीप्रभू संजय राऊत धडकणार गाझिपुर बॉर्डरवर

शेतकरी आंदोलन : शिवसेनेचे बाजीप्रभू संजय राऊत धडकणार गाझिपुर बॉर्डरवर

Subscribe

संजय राऊत सिंघू बॉर्डरवर शेतकरी आंदोलकांना भेटणार

दिल्लीच्या सीमेवर गेल्या ३ महिन्यांपासून पंजाब-हरियाणाच्या शेतकऱ्यांनी आंदोलन सुरु ठेवले आहे. केंद्र सरकारने आणलेल्या कृषी कायद्यांना शेतकरी विरोध करत आहेत. या शेतकरी आंदोलनाला अनेक नेत्यांनी पाठिंबा दिला आहे. शेतकऱ्यांनी आदोलन केल्यानंतर अनेक नेते समर्थन देण्यासाठी आंदोल शेतकऱ्यांना भेट देत आहेत. आता यामध्ये शिवसेनानेही उडी घेतली आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत मंगळवारी दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत. दिल्लीच्या गाझिपुर सीमेवर शेतकऱ्यांना संजय राऊत भेटणार आहेत. याबाबतची माहिती संजय राऊत यांनी ट्विट करत दिली आहे. संजय राऊत शेतकरी आंदोलकांशी चर्चा करणार आहेत. शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आदेश दिल्यामुळे दिल्ली दौरा करणार असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

दिल्लीतील शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रातही शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारले होते. मुंबईतील आझाद मैदानावर राज्यातील शेतकरी जमले होते. या शेतकरी आंदोलनात सर्वच पक्षातील नेत्यांनी सहभाग घेत समर्थन दिले होते. पंरतु शिवसेनेचा एकही नेता या शेतकरी आंदोलनात सहभागी झाला नाही. यावरुन संजय राऊत यांच्या दौऱ्यावर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

- Advertisement -

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शेतकऱ्यांना संकटात मदत करत असतात. शेतकऱ्यांना होणारा त्रास पाहून दुःख होते. असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. संजय राऊत मंगळवारी ३ फेब्रुवारी २०२१ दिल्ली दौरा करणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -