घरमुंबईनागपाडा येथील चायना बिल्डिंगला आग; पाच जण जखमी

नागपाडा येथील चायना बिल्डिंगला आग; पाच जण जखमी

Subscribe

आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत. जखमींमध्ये दोन वर्षीय चिमुकलीचा समावेश असून एकाची प्रकृती चिंताजनक आहे.

कामाठीपुरा येथील नागपाडामधील चायना इमारतीला आज सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. या आगीत पाच जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत. जखमींमध्ये दोन वर्षीय चिमुकलीचा समावेश असून एकाची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेत आदिल कुरेशी (वय २०), निशा देवी (वय ३२), चंदादेवी (वय ६०), अनिया (वय २), मोहनराम (वय ७०) जखमी झाले आहेत. यामध्ये मोहनराम यांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

आगीचे कारण अद्याप अस्पष्ट

नागपाडा येतील बगदादी कंपाउंडमध्ये चायना इमारत आहे. या इमारतीला सकाळी ९ वाजताच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. अद्याप ही आग का लागली? यामागील कारण अस्पष्ट आहे. दरम्यान कामाठीपुरातील अरुंद रस्त्यांमुळे अग्निशामक दलाच्या जवानांना घटनास्थळी दाखल होण्यास त्रास झाला.

- Advertisement -

सकाळी ८.१५ ते ८.३० च्या सुमारास घटना घडली. सुरुवातीला आगीचे प्रमाण कमी होते. या आगीमध्ये ज्येष्ठांना पळ काढताना त्रास झाला. इमारतीला भेगा पडल्या असून इमारत खाली करण्यात आली आहे. दरम्यान या घटनेत ७ जण जखमी झाले आहेत. नायर हॉस्पिटलमध्ये जाणार असून जखमींची चौकशी करणार असून मनुष्यहानी होऊ नये, म्हणून काळजी घेत आहोत.
किशोरी पेडणेकर, महापौर, मुंबई

मुंबईतील नागपाडा येथील चायना इमारतीला आग, अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल

मुंबईतील नागपाडा येथील चायना इमारतीला आग,अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल

आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಭಾನುವಾರ, ಜನವರಿ 5, 2020

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -