घरताज्या घडामोडीठाणे जिल्ह्यातील पालिका आयुक्त बदलले, कल्याण- डोंबिवलीचे कधी बदलणार?

ठाणे जिल्ह्यातील पालिका आयुक्त बदलले, कल्याण- डोंबिवलीचे कधी बदलणार?

Subscribe

राज्यात सर्वाधिक महापालिकांचा जिल्हा अशी ओळख असलेल्या ठाणे जिल्ह्यात काल कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे चार महापालिका आयुक्तांच्या तडकाफडकी उचलबांगडी करण्यात आल्या. मात्र ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक कोरोना रुग्ण वाढीचा वेग असलेल्या कल्याण-डोंबिवली महापालिकेला हाच न्याय कधी लावला जाणार असा प्रश्न सर्वसामान्य कल्याण-डोंबिवलीकर विचारत आहेत.

शहरीकरणाचा जोरदार रेटा असलेल्या ठाणे जिल्ह्यात ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, मीरा-भाईंदर, भिवंडी- निजामपुरा, उल्हासनगर या सहा महापालिका आहेत. तर अंबरनाथ आणि बदलापूर या दोन नगरपरिषद आहेत. यापैकी ठाणे, मीरा-भाईंदर, भिवंडी-निजामपूर आणि उल्हासनगर या चारही महापालिकांमध्ये काही दिवसांपूर्वीच नव्याने पालिका आयुक्त नेमण्यात आले होते. ठाणे महापालिकेत विजय सिंघल आयुक्त म्हणून नियुक्त होण्यापूर्वी संजीव जयस्वाल हे या महापालिकेत तब्बल पाच वर्ष पालिका आयुक्त होते. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी असलेले घनिष्ट संबंध यामुळे जयस्वाल यांची पाच वर्षाची आयुक्तपदाची टर्म अनेक वादांनी गाजल्यानंतर ही अबाधित राहिली. त्यांच्यानंतर ठाण्यामध्ये आयुक्त म्हणून विजय सिंघल यांची दोन अडीच महिन्यांपूर्वी नियुक्ती करण्यात आली होती. मात्र सिंघल यांच्या या अडीच महिन्यांच्या अल्पायुषी ठरलेल्या कारकिर्दी बाबतही ठाण्यातील मंत्री, आमदार, नगरसेवक यांच्या प्रतिक्रिया त्यांच्या बाबत नाराजी दर्शवणाऱ्या आहेत. ठाण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव लॉकडाउनच्या काळात कमी होण्याऐवजी मोठ्या प्रमाणावर वाढला. त्याबाबत पालिका आयुक्त सिंघल यांनाच जबाबदार धरले जात आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनाही कोरोनाची लागण झाली होती मात्र दैव बलवत्तर आणि प्रबळ इच्छाशक्ती याच्या जोरावर आव्हाड यातून तावून सुलाखून निघाले. मात्र ठाण्यातले दोन नगरसेवक विलास कांबळे आणि आणि मुकुंद केणी या दोघांचा कोरोनाने बळी घेतला. मात्र त्यानंतरही ठाणे महापालिकेला काही जाग आली नाही. धोरणामुळे ठाणे शहराची आर्थिक-सामाजिक, व्यावसायिक घडी पूर्णतः विस्कटलेली आहे.

- Advertisement -

मात्र आयुक्त सिंघल हे नगरसेवक आमदार आणि मंत्र्यांच्या छोट्या छोट्या कामांनाही विलंब लावत असल्याने त्यांच्याबाबत राजकीय वर्तुळात नाराजीचा सूर होताच. त्यामुळेच काल रात्री अचानक त्यांच्या उचलबांगडीचे आदेश मुख्यमंत्री कार्यालयातून निघाले असे सांगण्यात येते.

मीरा भाईंदर महापालिका आयुक्त चंद्रकांत डांगे यांनीही फेब्रुवारीमध्येच आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारला होता मात्र त्यांनाही कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात अपयश आले. तसेच डांगे यांच्या कार्यपद्धतीबाबत स्थानिक शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनीही खाजगीत नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे डांगे नाही केवळ अडीच तीन महिन्यातच मीरा-भाईंदर पालिकेतून काढता पाय घ्यावा लागला असे बोलले जाते.

- Advertisement -

नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त अण्णासाहेब मिसाळ हे वर्षभरापूर्वी पालिका आयुक्तपदी आले होते. देवेंद्र फडणवीस सरकार मधील ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि अण्णासाहेब मिसाळ यांचे सलोख्याचे संबंध होते. पंकजा मुंडे यांनी हट्ट केल्यामुळेच फडणवीस यांनी अण्णासाहेब मिसाळ यांची नवी मुंबईच्या आयुक्तपदी नियुक्ती केली होती. गेल्या नोव्हेंबर महिन्यात राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर काही ठिकाणी अधिकारी बदलले गेले त्यावेळीही अण्णासाहेब मिसाळ यांच्या उचलबांगडीची शक्यता होती. मात्र त्यावेळीही नगर विकास मंत्री ठाणे जिल्ह्याचे पालक मंत्री एकनाथ शिंदे यांनी मिसाळ यांना सांभाळून घेतले होते. मिसाळ यांच्या कार्यपद्धतीबाबत नगरसेवक आमदार यांच्याही मोठ्या प्रमाणावर तक्रारी होत्या मात्र त्या तक्रारींकडे ही कानाडोळा करण्यात आला. मिसाळ यांनीही सत्ताबदल होताच आघाडी सरकारमधील मंत्री धनंजय मुंडे यांचे यांच्याशी सूत जुळवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र काल अखेरीस कोरोनाच्या साथमारीत अण्णासाहेब मिसाळ यांनाही पालिका आयुक्त पदावर पाणी सोडावे लागले.

उल्हासनगरचे आयुक्त समीर उन्हाळे हे ठाणे महापालिकेत अतिरिक्त आयुक्त पदी होते. त्यांनी यापूर्वीही उल्हास नगर पालिका आयुक्त म्हणून कामकाज केले होते. त्यामुळे त्यांना खरे तर पंधरा दिवसांपूर्वीच उल्हासनगरात आयुक्त म्हणून दुसरी टर्म मिळाली होती. मात्र उल्हासनगर आतही कोरोणाचा प्रादुर्भाव वाढत राहिला. त्यामुळे त्याचे खापर अवघ्या पंधरा दिवसांपूर्वी पालिकेत आलेल्या उन्हाळे यांच्यावर ती फोडण्यात आले.

कल्याण-डोंबिवलीत बदल केव्हा?

वास्तविक वास्तविक जर कोरोना रुग्ण वाडीचा निकष लावायचा तर ठाणे जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपासून सर्वाधिक रुग्ण वाढ ही कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात होत आहे. राज्य सरकारने काल ठाणे जिल्ह्यातील चार पालिका आयुक्त बदलले मात्र ज्या कल्याण डोंबिवली शहरांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढ सर्वाधिक आहे तेथील पालिका आयुक्त मात्र राज्य सरकारने अद्याप बदललेले नाहीत. पालिका आयुक्त सूर्यवंशी यांना महापालिकांच्या कारभाराचा कोणताही पूर्वानुभव नाही, कल्याण-डोंबिवलीच्या भौगोलिक परिस्थितीची परिस्थितीची त्यांनी अद्याप पुरेशी माहिती करून घेतलेली नाही. त्यामुळे आपल्या एसी केबिनमध्ये बसून कागदोपत्री वाट्टेल तसे आदेश काढायचे असा एक कलमी कार्यक्रम सध्या कल्याण-डोंबिवली पालिकेत सुरू आहे. कल्याण-डोंबिवलीतील स्थानिक आमदार सर्वपक्षीय नगरसेवक हे पालिका आयुक्तांच्या कारभाराबाबत समाधानी नाहीत डोंबिवलीकरांमध्ये तर आयुक्तांच्या कामकाजाबाबत प्रचंड रोष आहे मात्र तरीही ठाणे जिल्ह्यातले चार पालिका आयुक्त बदलले गेले व ज्या पालिकेत सर्वाधिक रुग्ण आहे त्या कल्याण-डोंबिवली पालिका आयुक्तांना मात्र अध्याप राज्य सरकारने अभय दिले आहे याबद्दल सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -