घरमुंबईकृत्रिम तलावांमध्ये गणेश मूर्तींच्या विसर्जनामध्ये वाढ

कृत्रिम तलावांमध्ये गणेश मूर्तींच्या विसर्जनामध्ये वाढ

Subscribe

मुंबईत गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा केला जातो. गणेशोत्सव साजरा करताना पर्यावरणाचा र्‍हास होऊ नये म्हणून मुंबई महापालिकेकडून भाविकांमध्ये जागृती केली जात आहे. याचा परिणाम म्हणून यावर्षी कृत्रिम तलावांमध्ये गणेश मूर्तींच्या विसर्जनात वाढ झाली आहे.

श्री गणेशाची मूर्ती बनवताना प्लास्टर ऑफ पॅरिसला प्राधान्य दिले जाते. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती समुद्रात, तलावात विसर्जन केल्याने पाणी दूषित होऊन पाण्यातील जीवांना त्यापासून धोका निर्माण होतो. यामुळे पर्यावरणाचा र्‍हास होत असल्याचा मुद्दा पुढे आल्याने २००७ मध्ये तत्कालीन महापौर शुभा राऊळ यांनी महापौर बंगल्यासह मुंबईत ठिकठिकाणी कृत्रिम तलाव उभारून त्यात श्री गणेशाच्या मूर्तींचे विसर्जन करण्याचे आवाहन केले होते. गेली ११ वर्षे मुंबईत कृत्रिम तलावांमध्ये गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात येत आहे.

- Advertisement -

महापालिकेकडून दरवर्षी गणेश विसर्जनासाठी ३१ कृत्रिम तलाव तयार करण्यात येतात. यावर्षी पालिकेने ३२ कृत्रिम तलाव तयार केले आहेत. या कृत्रिम तलावांमध्ये श्री गणेश मूर्तींचे विसर्जन करावे म्हणून गणेशभक्तांमध्ये जागृती केली जाते. मुंबईचे प्रथम नागरिक असलेले महापौर याबाबत आवाहन करत असतात. याचा परिणाम म्हणून कृत्रिम तलावात सन २०१५ मध्ये १०,९९६, सन २०१६ मध्ये १३,९२१, सन २०१७ मध्ये १३,११३ मूर्तींचे विसर्जन करण्यात आले होते. यावर्षी दीड दिवसांच्या १५ हजार १४२ मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावात करण्यात आले. त्यामध्ये ९० सार्वजनिक आणि १५ हजार ५२ घरगुती गणेश मूर्तींचा समावेश आहे.

प्लास्टर ऑफ पॅरिसपासून बनवलेल्या मूर्ती पाण्यामध्ये सहजासहजी विरघळत नाहीत. आकर्षक प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीना मोठ्या प्रमाणावर पसंती मिळत असल्याने त्यांच्या विघटनासाठी पुण्यातील कमिन्स इंडिया लिमिटेड आणि राष्ट्रीय रासायनिक प्रयोग शाळा गेल्या पाच वर्षापासून संशोधन करीत आहे. बेकरीत वापरला जाणारा खाण्याचा सोडा आणि पाणी या मिश्रणात या मूर्तीचे योग्य रीतीने विघटन होत असल्याचे संशोधनातून सिद्ध झाल्याने पुण्यात हा प्रयोग राबवला जात आहे. गणेशमूर्ती विसर्जनसाठी पालिकेने १५ टन अमोनियमची खरेदी करण्यात आली आहे. लोकांनी पर्यावरणपूरक पध्दतीने गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे, असे आवाहन “जी – दक्षिण” विभागाचे सहाय्यक आयुक्त देवेंद्रकुमार जैन यांनी केले आहे.

- Advertisement -

दीड दिवसांच्या मूर्तींमध्ये घट 

२०१६ मध्ये दीड दिवसांच्या ६८ हजार ३५३ गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले होते. २०१७ मध्ये त्यात ३०३९ मूर्तींची वाढ झाली होती. मागील वर्षी ७१ हजार ३९२ मूर्तींचे विसर्जन करण्यात आले होते. यावर्षी त्यात ३६१६ ने घट झाली आहे. यावर्षी ६७ हजार ७७६ गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले आहे.

कृत्रिम तलावातील गणेश विसर्जन

सन घरगुती सार्वजनिक एकूण
2015 10957 39 10996
2016 13766 155 13921
2017 12999 114 13,113
2018 15052 90 15142

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -