घरमुंबईमुंबईच्या मुख्य दरवाजाला तडा! गेटवे ऑफ इंडियाचं अस्तित्व धोक्यात?

मुंबईच्या मुख्य दरवाजाला तडा! गेटवे ऑफ इंडियाचं अस्तित्व धोक्यात?

Subscribe

मुंबईची शान असलेला गेटवे ऑफ इंडिया... १०० वर्षांच्या इतिहासासह दक्षिण मुंबईतील समुद्रकिना-याजवळ असलेल्या गेटवे ऑफ इंडियाचं अस्तित्व धोक्यात आलंय.

Gateway of India in Danger: मुंबईची शान असलेला गेटवे ऑफ इंडिया… १०० वर्षांच्या इतिहासासह दक्षिण मुंबईतील समुद्रकिना-याजवळ असलेले गेटवे ऑफ इंडिया हे भारतातील माया शहर मुंबईतील एक ऐतिहासिक प्रवेशद्वार आहे. विसाव्या शतकात इंग्लंडचे प्रिन्स जॉर्ज पंचम आणि राणी मेरी यांच्या भारत भेटीदरम्यान, त्यांच्या स्वागतासाठी ते बांधले गेले. परंतू मुंबईचे हे ऐतिहासिक प्रवेशद्वाराची आता दयनीय अवस्था झाली आहे.

दुरुस्ती आणि देखभालीकडे दुर्लक्ष केल्यामुळे या ग्रेड 1 हेरिटेजची अवस्था बिकट होत चालली आहे. १०० वर्षांचा हा वारसा आता मोडकळीस आला आहे. या प्रवेशद्वाराच्या भिंतींवर गवतासह शेवाळ साचले आहे. महाराष्ट्राच्या पुरातत्व विभागाच्या पाहणी अहवालात ही माहिती समोर आली आहे. याबाबत चिंता व्यक्त करत पुरातत्व विभागाने तातडीने दुरुस्ती करण्याची सूचना शासनाला केली आहे.

- Advertisement -

गेट वे ऑफ इंडियाच्या दुरवस्थेबाबत पुरातत्व विभागाच्या तपासणीत आलेल्या अहवालानुसार गेट वे ऑफ इंडियाच्या पाया आणि भिंतींना भेगा पडल्या आहेत. याव्यतिरिक्त समुद्राच्या लाटांमधून इमारतीमध्ये प्रवेश करणाऱ्या पाण्याचं नंतर बाष्पीभवन होतं, परंतू हे क्षार भेगा आणि खड्ड्यांमध्ये टिकून राहतात. या वास्तूंची जीर्ण झालेली स्थिती दुरुस्त करून सुधारावी, अशी मागणी राज्य पुरातत्व विभागाने राज्य सरकारकडे केली आहे.

सर्वेक्षण करणाऱ्या लोकांच्या म्हणण्यानुसार, हेरिटेजची सद्यस्थिती सुधारण्यासाठी एक वर्षाचा कालावधी लागेल, त्यासाठी सरकारकडून तातडीने परवानगी आणि निधीची आवश्यकता आहे. त्यांच्या मते हे काम पावसाळ्यापूर्वी सुरू व्हायला हवे. या इमारतीच्या दुरुस्तीसाठी एकूण ६.९ कोटी रुपये खर्च येणार आहे.

- Advertisement -

पर्यटनासाठी महत्त्वाचे
गेटवे ऑफ इंडिया हे पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठिकाण आहे. ते पाहण्यासाठी देश-विदेशातील पर्यटक येतात. इंडो-सारासेनिक शैलीत बांधलेले हे स्मारक पाचव्या जॉर्जच्या आगमनाच्या वेळी ब्रिटिश काळात बांधले गेले. या हेरिटेजचे बांधकाम डिसेंबर १९११ मध्ये सुरू झाले, जे १९२४ मध्ये पूर्ण झाले. हा वारसा वर्षानुवर्षे देश-विदेशातील पर्यटकांना आकर्षित करत आहे. यासोबतच अनेक चित्रपटांतून दिसणारा हा वारसा वेगळी ओळख आहे. मुंबईच्या अस्मितेसाठी गेट वे ऑफ इंडियाचे स्वतःचे एक अस्तित्व आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -