घरमुंबईख्रिस्ती कर्मचार्‍यांसाठी गुड फ्रायडे

ख्रिस्ती कर्मचार्‍यांसाठी गुड फ्रायडे

Subscribe

ऐवजी 20 एप्रिलला निवडणूक प्रशिक्षण

निवडणूक कर्तव्यावर असलेले शिक्षक व सरकारी कर्मचारी यांसाठी 18 व 19 एप्रिलला निवडणूक प्रशिक्षण ठेवण्यात आले होते. मात्र 19 एप्रिलला गुड फ्रायडे असल्याने ख्रिस्ती धर्मीय कर्मचार्‍यांनी संताप व्यक्त केला. ख्रिस्ती धर्मीयांच्या भावनांचा आदर करत 19 एप्रिलला प्रशिक्षणाला अनुपस्थित राहण्याची सवलत देत त्यांना 20 एप्रिल रोजी प्रशिक्षण देण्याचा निर्णय जिल्हाधिकार्‍यांनी घेतला आहे.

मुंबईतील शिक्षक व अन्य सरकारी कर्मचार्‍यांना निवडणुकीच्या कामासाठीचे 18 व 19 एप्रिलला असलेल्या प्रशिक्षणासंदर्भातील आदेश 15 एप्रिलला सर्व शिक्षकांना पाठवण्यात आले होते. मुंबई उपनगरात बोरीवली, दहिसर, कांदिवली, चारकोप, मालाड (पश्चिम), जोगेश्वरी (पूर्व), दिंडोशी, वर्सोवा या विधानसभा मतदारसंघात हे प्रशिक्षण ठेवण्यात आले आहे. मात्र 19 एप्रिलला गुडफ्रायडे असून, त्यादिवशी चर्चमध्ये तीन विशेष प्रार्थना घेण्यात येतात. त्यामुळे ख्रिस्ती नागरिकांना चर्चमध्ये उपस्थित राहणे आवश्यक असते. परंतु त्याच दिवशी निवडणूक आयोगाने प्रशिक्षण कार्यक्रम ठेवल्याने त्यांना प्रार्थना सभेला उपस्थित राहता येणार नाही. त्यामुळे ख्रिस्ती धर्मीयांमध्ये संतापाचे वातावरण परसले होते.

- Advertisement -

यासंदर्भात टीचर्स डेमोक्रेटीक फ्रंट या शिक्षकांच्या संघटनेकडून प्रशिक्षण पुढे ढकलण्यासंदर्भात विनंती केली होती. ख्रिस्ती धर्मीयांच्या भावनांचा आदर राखत निवडणूक आयोगाने ख्रिस्ती कर्मचार्‍यांना या दिवशी प्रशिक्षणाला अनुपस्थित राहण्यासाठी सवलत दिली आहे. 19 एप्रिलऐवजी ख्रिस्ती कर्मचार्‍यांना २० एप्रिलला प्रशिक्षणासाठी उपस्थित राहण्याचे निर्देश मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी दिले आहेत. जिल्हाधिकार्‍यांच्या निर्णयामुळे ख्रिस्ती धर्मीयांना दिलासा मिळाला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -