घरमुंबईमुंबईकरांसाठी खुशखबर; आणखी १२ एसी लोकल येणार

मुंबईकरांसाठी खुशखबर; आणखी १२ एसी लोकल येणार

Subscribe

रेल्वे बोर्डाने काही महिन्यांपूर्वीच आणखी बारा वातानुकूलित लोकल गाड्यांच्या प्रकल्पाला पश्चिम आणि मध्य रेल्वेवर दाखल करण्यास मंजुरी दिली.

मुंबईकरांसाठी दुसरी एसी लोकल पश्चिम रेल्वे मार्गावर आली आहे. तिच्या पुढच्या आठवड्यात चाचण्या होणार आहेत. उपनगरीय प्रवाशांसाठी आणखी १२ एसी लोकल येणार आहेत. ज्यात मध्य आणि पश्चिम रेल्वेला प्रत्येकी ६-६ लोकल देण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईकरांचा प्रवास गारेगार होण्यास मदत होणार आहे.

मध्य आणि पश्चिम मार्गावर धावणार एसी लोकल

पश्चिम रेल्वेवर पहिली वातानुकूलित लोकल डिसेंबर २०१७ मध्ये धावली. एसी लोकलला मिळणारा वाढता प्रतिसाद बघून रेल्वेकडून मध्य आणि पश्चिम रेल्वेवर आणखी एसी लोकल आणण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे बोर्डाने काही महिन्यांपूर्वीच आणखी बारा वातानुकूलित लोकल गाड्यांच्या प्रकल्पाला पश्चिम आणि मध्य रेल्वेवर दाखल करण्यास मंजुरी दिली. २०१९ मध्ये या लोकल टप्प्याटप्यात दाखल होणार आहे. प्रत्येकी सहा वातानुकूलित लोकल पश्चिम आणि मध्य रेल्वे प्रवाशांच्या सेवेत चाचणीनंतर येतील. यातील एक लोकल आली असून चाचणीनंतर पश्चिम रेल्वेवर चालवण्यात येईल. तर महिनाभरात दुसरीही वातानुकूलित लोकल पश्चिम रेल्वेवर येणार आहे. जून महिन्यात मध्य रेल्वेवर पहिली वातानुकूलित लोकल दाखल झाल्यानंतर या लोकलची चाचणी घेण्यात येईल आणि पावसाळानंतर प्रवाशांच्या सेवेत येणार असल्याची माहिती रेल्वे बोर्डाचे रोलिंग स्टॉकचे सदस्य राजेश अग्रवाल यांनी बुधवारी दिली आहेत.

- Advertisement -

एसी लोकलचे तिकिट दर कमीच

एसी लोकलचे तिकिट दर ३ जूनपासून वाढविण्यात आलेले आहे. त्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजी आहे. परिणामी तिकिट दर कमी करण्यात यावेत असा प्रश्न विचारला असता अग्रवाल यांनी तिकिट दर ठरविण्याचा अधिकार रेल्वे बोर्डाचा असल्याचे स्पष्ट करीत शहरातील बस आणि टॅक्सी सेवेच्या तुलनेत कमीच असल्याचे स्पष्ट केले. तसेच गेल्या १० वर्षात लोकलच्या तिकिट दरात वाढ झाली नसल्याचे देखील सांगितले.

- Advertisement -

हेही वाचा – 

मुंबईकरांच्या सेवेसाठी लवकरच दुसरी एसी लोकल

साडेतीनशे फुकट्यांना एसी लोकलच्या गारव्यात फुटला घाम

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -