घरमुंबई'अभय योजने'ला म्हाडा रहिवाशांचा उत्तम प्रतिसाद

‘अभय योजने’ला म्हाडा रहिवाशांचा उत्तम प्रतिसाद

Subscribe

महानगरपालिकेने म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाच्या रहिवाशी यांच्यासाठी अभय योजना जाहीर करण्यात आली होती. व या योजनेला म्हाडा रहिवाशांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे.

कोरोना साथरोगाच्या पार्श्वभूमीवर लागू टाळेबंदीमुळे सर्वसामान्यांना आर्थिक फटका बसला होता. त्यामुळे म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाच्या २१ हजार १४९ संक्रमण शिबिर गाळ्यांमधील भाडेकरू रहिवाशी यांच्यासाठी अभय योजना जाहीर करण्यात आली होती. या अभय योजनेला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या योजनेअंतर्गत संक्रमण शिबिर गाळ्यांमधील भाडेकरु, रहिवाशांनी संपूर्ण थकीत भाडे विहित मुदतीत भरल्यास निव्वळ व्याजावर सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ही योजना दोन टप्प्यांत फेब्रुवारी-२०२१ आणि मार्च-२०२१ या दोन महिन्यांत लागू राहणार आहे.

पहिल्या टप्प्यांतर्गत संपूर्ण थकीत भाडे रकमेची मुद्दल भरणाऱ्या संक्रमण शिबिर गाळ्यांतील भाडेकरू रहिवाशांना एकूण व्याजामध्ये ६० टक्क्यांपर्यंत सवलत देण्यात आली आहे. या योजनेला प्रतिसाद दिल्याबद्दल संक्रमण शिबिरातील भाडेकरू रहिवाशी यांचे घोसाळकर यांनी आभार मानले व अभय योजना यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे मुख्य अधिकारी अरुण डोंगरे,  उपमुख्य अधिकारी (संक्रमण गाळे) तुषार राठोड, संबंधित मिळकत व्यवस्थापक, भाडेवसुलीकार यांचे कौतुक केले.

- Advertisement -

योजनेच्या दुसऱ्या टप्प्यांतर्गत संक्रमण शिबिर गाळ्यातील भाडेकरू रहिवाशी यांनी दि. ३१ मार्च, २०२१ पर्यंत संपूर्ण थकीत भाडे रकमेची मुद्दल भरल्यास एकूण व्याजामध्ये ४० टक्क्यांपर्यंत सवलत दिली जाणार आहे. याचाही लाभ घेण्याचे आवाहन घोसाळकर यांनी केले. महानगरपालिकेच्या या योजनेअंतर्गत एकून १३ विभागातून ३ कोटी ८४ लाख ७९ हजार ४०४ रुपयांची भाडेवसुली २८ फेब्रुवारी,२०२१ पर्यंत करण्यात आली आहे. अशी माहिती मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे सभापती विनोद घोसाळकर यांनी दिली.


हे वाचा-मुंबई बँकेची एकदा नाही, हजारदा चौकशी करा, दरेकरांचं खुलं आव्हान

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -