घरमनोरंजन'सायना' चे पोस्टर रीलीज,परिणीती चोप्रा मुख्य भूमिकेत

‘सायना’ चे पोस्टर रीलीज,परिणीती चोप्रा मुख्य भूमिकेत

Subscribe

बॅडमिंटनपट्टू सायना नेहवालवर बायोपिक येत आहे.

जागतिक ज्युनियर बॅडमिंटन स्पर्धा जिंकणारी सायना ही पहिली भारतीय महिला आहे. या बॅडमिंटनपट्टू सायना नेहवालवर बायोपिक येत आहे. यात सायना नेहवालच्या मुख्य भूमिकेत बॉलिवूडमधील अभिनेत्री परिणाती चोप्रा दिसणार आहे. परिनीतीने तिच्या सोशल मिडियाद्वारे पहिले पोस्टक रीलीज केले आहे. यात तिने या चित्रपटाची तारीख जाहीर केली आहे. या चित्रपटाचे नाव ‘सायना’ असे आहे. २६ मार्चला हा सिनेमा चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटासाठी परिणीती चोप्राने खूप मेहनत घेतली आहे. याआधी सायना नेहवालच्या भूमिकेसाठी श्रध्दा कपूर या अभिनेत्रीला कास्ट केले होते. परंतू काही कारणास्तव श्रध्दा कपूर च्या ऐवजी परिणीतीला कास्ट करण्यात आले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Parineeti Chopra (@parineetichopra)

- Advertisement -

टीझरची सुरुवात बॅडमिंटन कोर्टमधून होते, जिथे परिणीती खांद्यावर तिरंगा ठेवून धावताना दिसते. त्यानंतर परिणीति प्रॅक्टीस करताना दिसते आहे. टीझर मध्ये परिणीतीचा आवाजात ‘समोर कोणीही असो मी फक्त मारणार’ असा डायलॉग ऐकायला मिळाला आहे.


अभिनेत्री परिणीती चोप्रा तिच्या ‘गर्ल ऑन द ट्रेन’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. सिनेमातील परिणीतीच्या भूमिकेला चाहत्यांची मोठी पसंती मिळत आहे. त्यातच सायना नेहवालच्या भूमिका साकारल्यामुळे तिला अधिक लोकप्रियता मिळू शकते.

- Advertisement -

हेही वाचा – नाशिकमध्ये बॉम्ब सदृश्य वस्तू सापडल्याने खळबळ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -