घरमुंबईजीटी हॉस्पिटलला 'महात्मा गांधी व्यसन मुक्ती सेवा' पुरस्कार

जीटी हॉस्पिटलला ‘महात्मा गांधी व्यसन मुक्ती सेवा’ पुरस्कार

Subscribe

जीटी हॉस्पिटलला सामाजिक न्याय विभागाचा महात्मा गांधी व्यसन मुक्ती सेवा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. येत्या २ फेब्रुवारीला चंद्रपूरमध्ये हा पुरस्कार देण्यात येणार आहे

सध्या मुंबईसह महाराष्ट्रात तरुणांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांचेच व्यसन करण्याचे प्रमाण वाढले आहे. यासाठी अनेक सरकारी आणि पालिका हॉस्पिटल्समध्ये व्यसनमुक्ती केंद्र उघडण्यात आली आहे. जिथे ज्या रुग्णांना व्यसनापासून कायमची मुक्ती हवी असते अशा रुग्णांसाठी ओपीडी पातळीवर समुपदेशन आणि उपचार दिले जातात. असंच एक युनिट जीटी या सरकारी हॉस्पिटलमध्ये सुरू करण्यात आले आहे. ज्याला नुकतीच सरकारने ‘सेंटर’ अशी मान्यता दिली आहे. याच सेंटरला सामाजिक न्याय विभागाचा महात्मा गांधी व्यसन मुक्ती सेवा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. शुक्रवारी या सेंटरचा केंद्र सरकारकडून आढावा घेतल्यानंतर केलेल्या येत्या २ फेब्रुवारीला चंद्रपूरमध्ये हा पुरस्कार देण्यात येणार आहे.

२ टक्के रुग्ण ओपीडीत दाखल

गेल्या १५ वर्षांपासून या सेंटरमध्ये अनेक प्रकारच्या व्यसनांपासून मुक्ती देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. दारु, चरस, सिगारेट, तंबाखू, ड्रग्ज आणि विशेषत: सतत मोबाईलचा वापर करण्याची सवय असलेले तरुण आणि ज्येष्ठ वर्गातील रुग्ण या ओपीडीत दाखल होत आहेत. तर, मोबाईलचं व्यसन असलेले किमान २ टक्के रुग्ण सध्या दाखल होत आहेत.

- Advertisement -

१२००० व्यसनमुक्ती रुग्णांची नोंद

२०१७ – १८ या साली जीटी हॉस्पिटलच्या व्यसनमुक्ती केंद्रात १२ हजारांपेक्षा जास्त रुग्णांची ओपीडीमध्ये नोंद करण्यात आली आहे. तर, वॉर्डमध्ये किमान ३४ रुग्णांना दाखल करुन घेण्यात येतं. तसंच, १०० टक्के अॅडमिशन भरलेलं असतं. या रुग्णांना प्रशिक्षक डॉक्टर्स आणि नर्स दररोज एक तास समुपदेशन आणि एक तास योगा शिकवतात.

” जीटी हॉस्पिटलमधील व्यसनमुक्ती केंद्र हे गेल्या १५ वर्षांपासून व्यसनमुक्तीसाठी काम करत आहे. वेगवेगळ्या प्रकारची व्यसनं हल्ली लहान मुलांपासून ज्येष्ठापर्यंत सर्वांनाच जडली आहेत. तर, तरुणांमध्येही तंबाखू, गुटखा, दारुचं प्रमाण हे वाढतं आहे. मोबाईलचं ही व्यसन मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे आता सर्वांनाच स्वत: लाच चेक करण्याची गरज निर्माण झाली आहे. शिवाय, जनजागृतीसाठी आपण वेगवेगळे ड्राईव्ह घेतो. दरवर्षी सीएसएमटी, चर्चगेट या दोन्ही स्थानकांवर पथनाट्याच्या माध्यमातून व्यसनमुक्तीसाठी जनजागृती केली जाते. १४ ते ७० या वयोगटातील सर्वच व्यक्तींवर ट्रिटमेंट केली जाते. ” – डॉ. सारिका दक्षीकर, मानसोपचारतज्ज्ञ, जीटी हॉस्पिटल
” ज्या व्यक्तीची पूर्णपणे व्यसनमुक्ती झालेली असेल असे तरुण, तरुणी आता पुढे येऊन एनजीओ किंवा काही सामाजिक संस्थांच्या माध्यमातून जनजागृती करत आहेत. त्यामुळे, हल्ली जनजागृतीही वाढलेली दिसते. गेल्या १५ वर्षांपासून हे सेंटर सुरू आहे.” – डॉ. मुकुंद तायडे, जीटी हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक

हेही वाचा – 

- Advertisement -

जी टी रुग्णालयात पाण्याअभावी ७० शस्त्रक्रिया रखडल्या

Bhagyshree Bhuwadhttps://www.mymahanagar.com/author/bhagu/
भटकंती करायला खूप आवडतं. कोषात बसून राहणं अजिबात आवडत नाही. वडापाव प्रचंड आवडतो. जेवण तयार करण्याची आवड आहे. भरतनाट्यम शिकतेय. जीवनावर मनापासून प्रेम करते. नकार हा शब्द माझ्या शब्दकोशात नाही.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -