घरताज्या घडामोडीजम्मू-काश्मीरच्या श्रीनगरमध्ये चकमक; दोन दहशतवादी ठार, एक जवान जखमी

जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरमध्ये चकमक; दोन दहशतवादी ठार, एक जवान जखमी

Subscribe

चकमकीदरम्यान सुरक्षा दलातील जवानाला पायाला गोळी लागली असून उपचारासाठी ९२ बेस रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे.

जम्मू-काश्मीरची राजधानी श्रीनगर (Srinagar)च्या सीमेवरील रणबीरगड (Ranbirgarh) येथे सुरक्षा दलात आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले असून एक जवान जखमी झाला आहे. या चकमकीदरम्यान सुरक्षा दलातील जवानाला पायाला गोळी लागली आहे. त्यामुळे उपचारासाठी ९२ बेस रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे.

एका अधिकाऱ्याने सांगितले की, ‘स्पेशल ऑपरेशन ग्रुप आणि अन्य निमलष्करी दलाचे पथकाची संपूर्ण परिसरात शोध मोहीम सुरू आहे. या परिसरात दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.’

- Advertisement -

दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर गोळीबार केला

सुरक्षा दलाने दहशतवाद्यांना घेरावा घालून सरेंडर होण्यास सांगितले तेव्हा दहशतावद्यांनी गोळीबार सुरू केला. यानंतर सुरक्षा दलातील जवानांनी कारवाई होण्यापूर्वीचे एका दहशतावाद्याला ठार मारले. मग काही वेळाने पुन्हा एका दहशतवाद्याला ठार मारले.

अधिकाऱ्यांने सांगितले की, ‘श्रीनगरच्या हद्दीवर रणबीरगड (Ranbirgarh) पंजीनारामध्ये दहशतवाद्यांशी चकमक झाली. या कारवाईत पोलीस पथकही सामील होते.’ स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार, संपूर्ण भागात जोरदार गोळीबार झाल्याचे ऐकू आले. सुरक्षा दलाने आता संपूर्ण परिसर घेरला असून सध्या शोधू मोहीम सुरू आहे. सगळ्या वाहनांची तपासणी केली जात आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Corona Update: चिंतेत वाढ; देशात कोरोना बळींच्या संख्येने ओलांडला ३१ हजारांचा टप्पा!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -