घरमुंबईआता हाफकिनची सर्पदंशावरील लस 'येमेन'मध्ये!

आता हाफकिनची सर्पदंशावरील लस ‘येमेन’मध्ये!

Subscribe

हाफकिनच्या पोलिव्हॅलट अँटिस्नेक व्हेनमला येमेनमधून मागणी

भारतात सर्पदंश, विंचूदंश, श्वानदंशावरील लसींसाठी मुंबईच्या परळ येथील हाफकिन ही संस्था जगप्रसिद्ध आहे. फक्त भारतातील शहरांतून नाही, तर मोठ-मोठ्या देशांतून सर्पदंशावरील लसींची मागणी असते. आता या मागणीत येमेन देशाचाही समावेश झाला आहे. येमेन या पश्चिम आशियाई देशानेही जीवरक्षक लसींच्या पुरवठ्याची मागणी या संस्थेकडे केली आहे. हाफकिनमध्ये बनवलेल्या औषधांची, लसींची तपासणी केली असता या लसी सर्वोत्तम असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे, अनेक देशांकडून लसींची मागणी होत आहे.

पिंपरीत मोठं उत्पादन केंद्र

हाफकिन संस्थेकडून आतापर्यंत किडनी, कॅन्सर, टीबी, मधुमेह अशा आजारांवरील औषधांची निर्मिती केली आहे. इतकंच नाही, तर भारताच्या पोलिओ मुक्त मोहिमेत हाफकिन संस्थेने मोलाची भूमिका बजावली. त्यामुळे, हाफकिन ही संस्था औषध उत्पादन करणारी अग्रगण्य संस्था आहे. या संस्थेचं पिंपरी शहरात मोठं उत्पादन केंद्र आहे. ज्या ठिकाणी विविध आजारांवरील लसी तयार केल्या जातात. या लसींना परदेशातून मागणी असते. नुकतीच या संस्थेकडे येमेन देशाने जीवरक्षक लसींची मागणी केली आहे.

- Advertisement -

सापांच्या विषापासून अँटिस्नेक व्हेनम!

आशिया खंडातील सर्वात विषारी असलेल्या नाग, मण्यार, घोणस आणि फुरसे या सापांचे विष एकत्रित करून त्यापासून ‘पोलिव्हॅलट अँटिस्नेक व्हेनम’ लस तयार करण्यात येते. या औषधांच्या उत्पादन निर्मितीविषयी माहिती घेण्यासाठी येमेन देशाच्या प्रतिनिधी मंडळाने हाफकिन महामंडळाच्या पिंपरी विभागाला नुकतीच भेट दिली होती. या भेटीदरम्यान लस कशी तयार केली जाते? याबाबत आढावा घेण्यात आला. या लसी आणि औषधांचा येमेन देशाला मोठा फायदा होऊ शकेल. या विचारातून येमेन देशाने जीवरक्षक औषधांचा पुरवठा करण्याची मागणी केली आहे.


हेही वाचा – हाफकिनला पोलिओ लसींच्या उत्पादन, पुरवठ्याचे आदेश

याविषयी अधिक माहिती देताना हाफकिन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. राजेश देशमुख यांनी सांगितलं की, ‘‘येमेन देशातून साप, विंचू, श्वानदंशावरील लसींची मागणी करण्यात आली आहे. सर्पदंश प्रतिविष औषधांच्या तीन हजार कुप्या, विंचूदंश प्रतिविष औषधांच्या एक हजार कुप्या, श्वानदंश प्रतिविष औषधांच्या पाच हजार कुप्यांची आणि प्रतिधनुर्वात लसींच्या दहा हजार कुप्यांची मागणी करण्यात आली आहे. या मागणीनुसार, संबंधित जीवरक्षक औषधं तयार करून तातडीने येमेन देशाला पुरवठा केला जाईल. यासाठी सध्या औषध निर्माण करण्याची प्रक्रिया सुरू आहे.’’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -