घरताज्या घडामोडीकाही समाजकंटकांमुळे हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत, प्रवाशांचा खोळंबा

काही समाजकंटकांमुळे हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत, प्रवाशांचा खोळंबा

Subscribe

पनवेल स्थानकावर सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे आज सकाळी हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक ठप्प झाल्याचे समोर आले होते. सीएसएमटी आणि ठाण्याच्या दिशेने जाणारी लोकल वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे प्रवाशांचा खोळंबा झाला. पण हे काही समाजकंटकांमुळे झाल्याची माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिली आहे. सध्या पनवेल-सीएसएमटी दरम्यानची वाहतूक विलंबाने सुरू आहे.

मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी ट्वीटद्वारे सांगितले की, ‘पनवेल स्थानकावरील किमी 48/13 येथे काही समाजकंटकांनी सिग्नल वायर्स आणि लोकेशन बॉक्स तोडल्यामुळे नुकसान झाले आहे. यामुळे पनवेल जवळील सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला असून सकाळपासून गाड्या वेळापत्रकानुसार धावत आहेत.’

- Advertisement -

पुढच्या ट्विटमध्ये त्यांनी सांगितले की, ‘हार्बर मार्ग आणि ट्रान्स हार्बर मार्गावरून पनवेलकडे जाणाऱ्या गाड्या उशिराने धावत आहेत. लोकेशन बॉक्स दुरुस्त करण्याचे काम सकाळी 7.05 वाजता पूर्ण झाले आहे.’

- Advertisement -

हेही वाचा – चला..तिकिटा बुक करूक व्हयी! गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे तिकिटांचे बुकिंग एप्रिलच्या कोणत्या तारखेपासून सुरू ?…


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -