घरमहाराष्ट्रCNG Rates Hike : महाराष्ट्रात महागाईचा भडका, मुंबई-पुण्यात सीएनजीच्या दरात पाच रुपयांनी...

CNG Rates Hike : महाराष्ट्रात महागाईचा भडका, मुंबई-पुण्यात सीएनजीच्या दरात पाच रुपयांनी वाढ

Subscribe

सीएनजी, पीएनजी दरांत पुन्हा वाढ, आजपासून नवे दर लागू.

महाराष्ट्रात पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडलेले असताना आता सीएनजी आणि पीएनजीच्या (CNG – PNG) दरांमध्ये देखील वाढ झाली आहे. राज्यात मुंबई आणि पुणे शहारात सीएनजी आणि पीएनजीच्या दरांचा भडका उडाला आहे. महानगर गॅस लिमिटेडने पुन्हा एकदा सीएनजी आणि पीएनजीच्या दरांमध्ये मोठी वाढ केली आहे. सीएनजीच्या दरांत प्रति किलो ५ रुपये आणि पीएनजीच्या दरांत ४.५० रुपये वाढ करण्यात आली आहे. हे नवे दर मंगळवार मध्यरात्रीपासून लागू करण्यात आले आहेत. अवघ्या आठवडाभरात झालेली ही दुसरी दरवाढ आहे.

नव्या दरानुसार मुंबईत सीएनजी ७२ रुपये प्रति किलो आणि पाईप्ड कुकिंग गॅस ४५.५० रुपये प्रति किलो झाला आहे. तर पुण्यात सीएनजीचे दर ६८ रुपये प्रति किलोवरुन ७३ रुपये प्रतिकिलोवर पोहोचले आहेत. राज्य सरकारने व्हॅट कमी केल्यामुळे १ एप्रिलपासून सीएनजीचे दर ६ रुपयांनी कमी झाले होते. पण केंद्र सरकारने नैसर्गिक वायूचे दर ११० टक्क्यांनी वाढवल्यामुळे मुंबईत सीएनजी ७ रुपयांनी वाढून ६७ प्रति किलो तर पीएनजी ५ रुपयांनी वाढून ४१ रुपये प्रति किलोवर गेले होते. पण आता महानगर गॅस लिमिटेडने पुन्हा दर वाढवल्याने सामान्य मुंबईकरांना मिळालेला काहीसा दिलासाही आता नाहीसा झाला आहे.

- Advertisement -

ग्राहक केंद्रित कंपनी असल्याने आम्ही ८ लाखांहून अधिक सीएनजी आणि १८ लाखांहून अधिक घरगुती पाईप्ड गॅस ग्राहकांसाठी किमती स्थिर ठेवण्याचा प्रयत्न केला. परंतु गॅसच्या किमतींमध्ये लक्षणीय वाढ होत असल्याने आम्ही दरवाढ करण्याचा निर्णय घेतला, असे महानगर गॅस लिमिडेटच्या निवेदनात नमूद केले आहे.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -