घरताज्या घडामोडीचला..तिकिटा बुक करूक व्हयी! गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे तिकिटांचे बुकिंग एप्रिलच्या कोणत्या तारखेपासून...

चला..तिकिटा बुक करूक व्हयी! गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे तिकिटांचे बुकिंग एप्रिलच्या कोणत्या तारखेपासून सुरू ? वाचा सविस्तर

Subscribe

कोकणात गणपतीला जाण्यासाठी चाकरमानी वर्षभर वाट पाहत असतो. गणपती येण्याआधीच्या काही महिन्यांपासूनच चाकरमानी तयारी करत असतात. मागील दोन वर्षांपासून कोरोनाचे संकट राज्यात घोंघावत असल्यामुळे गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या अगदी कमी होती. काय रे! यंदाच्या गणपतीक तुम्ही गावाक येवूक नाय…अशीच चर्चा दोन वर्षांपासून सुरू होती. मात्र, राज्य सरकारने नवीन वर्षाच्या सुरूवातीला म्हणजेच गुढीपाडव्यापासून कोरोनाच्या निर्बंधांत शिथिलता आणल्यामुळे राज्यात आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे. आता कोरोनाचे निर्बंध उठवल्यानंतर गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे तिकिटांचे बुकिंग एप्रिल महिन्या अखेरीस सुरू होणार आहेत. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा उत्साह द्विगुणित होणार आहे.

गणेशोत्सवासाठी रेल्वे तिकीट २८ एप्रिलपासून आरक्षित करता येणार आहेत. कोरोनाच्या रूग्णांची संख्या अत्यंत कमी होत असल्याने यंदाचा गणेशोत्सव नेहमीच्या पारंपारिक पद्धतीने मोठ्या प्रमाणात साजरा होणार आहे. या वर्षी गणपती बाप्पाचे आगमन ३१ ऑगस्टला होणार आहे. यंदाच्या वर्षी हरितालिका ३० ऑगस्ट रोजी असून गणेश चतुर्थी ३१ ऑगस्ट रोजी आहे. त्यामुळे रेल्वे तिकिटांचे बुकिंग १२० दिवस आधीपासून सुरू होणारे आता एप्रिल महिन्याच्या २८ तारखेपासून सुरू होत आहे.

- Advertisement -

कोकणात शिमगा आणि गणेशोत्सव हे दोन सण पारंपारिक पद्धतीने मोठ्या दिमाखात साजरे केले जातात. त्यामुळे शहरी भागातला चाकरमानी हा हमखास आपली कामं सोडून किंवा कामावरच्या सुट्ट्या घेऊन तो गणपतीला आणि शिमग्याला हजेरी लावतो. कारण जरी चाकरमानी शहरी भागात असला तरी त्याचे लक्ष हे गावाकडेच असते. कोरोनामुळे गणेशोत्सव आनंदीत साजरा करायला मिळाला नव्हता. मात्र, यंदाच्या वर्षात कोरोनाचं विघ्न दूर झालं असून कोकण रेल्वेच्या गाड्यांना मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. त्यामुळे चाकरमान्यांचा प्रवास वेगवान आणि उत्साह द्विगुणित व्हावा, यासाठी कोकण रेल्वेच्या गणपती स्पेशल गाड्यांचे आरक्षण २८ एप्रिलपासून सुरू होत आहे. कोकण रेल्वेच्या मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झाल्याने आता कोकण रेल्वेच्या गाड्या विजेच्या इंजिनावर धावण्यास सुरूवात होणार असल्याने चाकरमान्यांचा प्रवास प्रदूषणमुक्त होणार आहे.


हेही वाचा : सामनावीर यांनी जो हिशोब ईडीला द्यायचाय त्याची चिंता करावी, संदीप देशपांडेंची राऊतांवर टीका

- Advertisement -

 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -