घरटेक-वेकHDFC बँकेच्या खातेधारकांना अलर्ट, २९ फेब्रुवारीपासून App बंद

HDFC बँकेच्या खातेधारकांना अलर्ट, २९ फेब्रुवारीपासून App बंद

Subscribe

HDFC बँकेचे App बंद होणार असल्याची पूर्व सूचना बँकेकडून खातेधारकांना देण्यात आली होती. HDFC बँकेचे जुने App बंद झाले असले तरीही खातेधारकांना प्ले स्टोअर मधून नवीन APP डाऊनलोड करता येणार आहे.

तुम्ही जर HDFC बँकेचे खातेधारक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. बँकेकडून खातेधारकांना अलर्ट जारी करण्यात आला आहे. मागील काही दिवसांपासून HDFC बँकेकडून एक मेसेज पाठवला जात आहे. या मॅसेजमध्ये सांगितले जात आहे की, HDFC बँकेचे जुने App २९ फेब्रुवारीपासून बंद होणार आहे. यामुळे खातेधारकांना पैसे ट्रान्सफर तसेच इतर बँकिंग सुविधांचा लाभ घेता येणार नाही आहे.

HDFC बँकेचे App बंद होणार असल्याची पूर्व सूचना बँकेकडून खातेधारकांना देण्यात आली होती. HDFC बँकेचे जुने App बंद झाले असले तरीही खातेधारकांना प्ले स्टोअर मधून नवीन APP डाऊनलोड करता येणार आहे. हे App फ्री डाऊनलोड करता येणार असून अधिक सुरक्षित असल्याचे बँकेकडून सांगितले जात आहे. तसेच, बँकेने पाठवलेल्या  मेसेजमध्ये नवीन App ची लिंक देखील देण्यात आली आहे.

- Advertisement -

या आधी देखील १८ जानेवारी २०२० रोजी मध्यरात्री १ वाजल्यापासून दुपारी १२ वाजेपर्यंत HDFC बँकेची नेट बँकींग, मोबाईल बँकींग, फोन बँकींग या सुविधा बंद होणार असल्याची पूर्वसूचना खातेधारकांना देण्यात आली होती. तसेच, मागील वर्षी देखील खातेधारकांना अशाच प्रकारे नेटबँकींग तसेच मोबाईल बँकींगच्या अडचणींचा सामना करावा लागला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -