घरCORONA UPDATEसव्वा लाख डॉक्टरांना ऑनलाईन प्रशिक्षण - राजेश टोपे

सव्वा लाख डॉक्टरांना ऑनलाईन प्रशिक्षण – राजेश टोपे

Subscribe

राज्यात कोरोनाचा फैलाव होत असताना राज्याचा आरोग्य विभाग त्यासाठी प्रत्येक टप्प्यावर काम करत आहे. या पार्श्वभूमीवर कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यास त्यांना उपचार देण्यासाठी प्रशिक्षित डॉक्टरांची देखील आवश्यकता भासणार आहे. त्यामुळे ‘गेल्या आठवड्यात या धर्तीवर २५० डॉक्टरांना ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात आलं असून हे डॉक्टर आता येत्या आठवड्याभरात राज्यातल्या सव्वा लाख डॉक्टरांना प्रशिक्षण देतील’, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. आज संध्याकाळी ४ वाजता आरोग्यमंत्र्यांनी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून राज्यातल्या जनतेशी संवाद साधला.

२५ हजार पीपीई किट, अडीच लाख एन ९५!

दरम्यान, भविष्यात निर्माण होऊ शकणाऱ्या कोरोना फैलावाच्या परिस्थितीत राज्य सरकारकडे पीपीई किट आणि एन ९५ मास्कसोबतच ट्रिपल लेअर मास्कचा पुरेसा साठा उपलब्ध आहे, अशी महिती राजेश टोपेंनी यावेळी दिली. ‘सध्या राज्य सरकारकडे २५ हजार पीपीई किट, अडीच लाख एनन ९५ मास्क आणि २५ लाख ट्रिपल लेअर मास्क उपलब्ध आहेत. त्यासोबतच सरकारी रुग्णालयांमध्ये दीड हजार तर खासगी रुग्णालयांमध्ये १ हजार व्हेंटिलेटर्स उपलब्ध आहेत’, असं देखील राजेश टोपेंनी दिली.

- Advertisement -

मुंबईत २९० कंटेनमेंट झोन

मुंबईतल्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ३०० पार गेली असताना मुंबईत एकूण २९० कंटेनमेंट झोन अर्थात कोरोनाच्या दृष्टीने रेड झोन असल्याचं राजेश टोपे या लाईव्हमध्ये म्हणाले. या ‘कंटेनमेंट झोनमध्ये आरोग्य सेवक मोठ्या संख्येने काम करत असून नागरिकांनी त्यांना सहकार्य करावं’, असं आवाहन राजेश टोपेंनी यावेळी केलं.

आहार कसा ठेवाल?

‘आवळा, मोसंबी, संत्रा, लिंबू यातूव व्हिटामिन सीचं अधिक सेवन करण्याची गरज आहे. जेवणात हळद, लसूण, धने, जिरं याचा वापर करायला हवा. योगासन प्राणायाम यातून व्यायाम करण्याची देखील गरज आहे, असं टोपे यावेळी म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -