घरमुंबईमुंबईला पावसाने धुतले; विरार-बोरिवली लोकल ठप्प

मुंबईला पावसाने धुतले; विरार-बोरिवली लोकल ठप्प

Subscribe

मुंबईत सलग पडणाऱ्या पावसामुळे जागोजागी पूर परिस्थिती निर्माण झाली. मुसळधार पावसाने मुंबईकरांची चांगलीच दैना झाली. पावसामुळे नालासोपारा रेल्वे स्थानक जलमय झाल्यामुळे मुंबई - बोरिवली विरार लोकल ठप्प झाली आहे.

सलग तीन दिवस सतत पडणाऱ्या पावसाने मुंबईला अक्षरश: धुतले आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचल्याने वाहतुकीची कोंडी झाली आहे. पावसामुळे नालासोपारा रेल्वे स्थानक पाण्याखाली गेले असल्यामुळे मुंबई – बोरीवली विरार लोकल ठप्प झाली आहे. तर मध्य आणि हार्बर रेल्वे वाहतूक १५ ते २० मिनीटे उशीराने धावत आहे. तसेच मुंबईत ४८ तासांत अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने वर्तवला आहे.

२४ तासातील पाऊस

कुलाबा – १४५.८ मिमी
सांताक्रुज – १३७.१ मिमी

- Advertisement -

लोकल ठप्प

अंधेरी, गोरेगाव, वसई, विरार, भांडुप, मुलुंड, डोंबिवली, कल्याण, कुर्ला, माटुंगा, सायन, घाटकोपर, दादर, परळसह संपूर्ण मुंबईत जोरदार पाऊस पडत आहे. पाणी साचल्याने रेल्वे तसेच रस्ते वाहतुकीवर याचा परिणाम झाला आहे. त्याचप्रमाणे वसई विरार आणि नालासोपारा रेल्वे रुळांवर पाणी साचल्यामुळे मुंबई – बोरिवली विरार लोकल ठप्प झाली आहे. पश्चिम रेल्वे सेवा भाईंदर पर्यंत धावत आहे. तर पावसामुळे एसी लोकल रद्द करण्यात आल्या आहेत.

विज खंडीत

पावसामुळे वसई, नालासोपारा आणि विरार या ठिकाणी सोमवरपासून विज खंडीत झाली आहे. यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल झाले आहे. अद्याप ही विज आली नसल्यामुळे नागरिकांना अंधारात राहावे लागत आहे.

- Advertisement -

डबेवाल्यांची सेवा बंद

वसई, विरार आणि नालासोपारा येथे रेल्वे रुळ पाण्याखाली गेल्यामुळे मुंबई – बोरीवली विरार लोकल ठप्प झाल्यामुळे याचा परिणाम मुंबईतील डबेवाल्यांच्या सेवेवर झाला आहे. पावसामध्पाये सायकल किंवा हातगाडी चालवणे शक्य नसल्यामुळे आज डबेवाल्यांची सेवा बंद ठेवण्याचा निर्णय डबेवाले कार्यकारणीने घेतला आहे. मुंबईकरांची भूक भागवणे त्यांच्या ऑफिसला डबे नेऊन पोहोचवणे हे काम  मुंबईतील डबेवाले करतात. त्यांच्या सेवेमध्ये कोणताही खंड पडत नाही. मात्र, पावसामुळे मुंबईतील डबेवाल्यांनी देखील आजचा दिवस सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अॉफिसला जाताना घरातूनच डबे घेऊन जाण्याची सुचना डबेवाला प्रवक्ते सुभाष तळेकर यांनी दिली आहे.

शाळांना सुट्टी

गेल्या तीन दिवसापासून पावसाचा जोर वाढल्यामुळे आज ही काही शाळांनी सुट्टी जाहीर केलीआहे. दादर, वसई आणि विरार मधील काही शाळांनी विद्यार्थ्यांना सुट्टी देण्याचा निर्णय घेतला आहे.

बेस्टच्या मार्गात बदल

मुंबईसह उपनगरात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचल्याने श्रीरंग साबडे मार्ग गोरेगांव पश्चिम, सायन रोड नंबर २४ आणि बांद्रा टॉकीज एस.व्ही. रोड या मार्गावरील बेस्टच्या मार्गात बदल करण्यात आले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -