घरमुंबईमुंबईत पावसाचा 'रेड अलर्ट'

मुंबईत पावसाचा ‘रेड अलर्ट’

Subscribe

मुंबईत सतत पडणाऱ्या पावसामुळं हवामान खात्याकडून 'रेड अलर्ट' सांगण्यात आलं आहे. पुढील दोन दिवस पावसाचा जोर असाच कायम राहणार.

गेले तीन दिवस मुंबई, ठाणे, वसई, पालघर, डहाणू या सर्व पट्ट्यात मुसळधार पावसानं धुमाकूळ घातला असून हवामान खात्यानं मुंबईत ‘रेड अलर्ट’ सांगितलं आहे. रविवारी संध्याकाळी थोडा वेळ विश्रांती घेतल्यानंतर सोमवारी पूर्ण दिवस पावसानं हजेरी लावली होती. सतत पाऊस असल्यामुळं मुंबईची लाईफलाईन अर्थात रेल्वेसेवा कोलमडली असल्याचं चित्र आहे. आज, मंगळवारीही हीच स्थिती कायम राहणार असून साधारण शुक्रवार १३ जुलैपर्यंत मुंबईमध्ये ‘रेड अलर्ट’ हवामान खात्यानं सांगितला आहे. तर कोकण, रायगड आणि ठाणे, पालघर या भागांमध्ये अतिवृष्टीचा इशारा प्रादेशिक हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.

कुलाब्यातील जुलै महिन्यातील सर्वाधिक पाऊस

मुंबईमध्ये जूनपासून पावसाला सुरुवात झाली आहे. मात्र, केवळ वीस दिवसात जून ते सप्टेंबर या काळातील सर्वाधिक अर्थात पावसाच्या ५४ टक्के पाऊस पडला असल्याची माहिती मुंबई महानगपालिकेच्या आकडेवारीनुसार मिळाली आहे. कुलाबामध्ये आतापर्यंत ११९०.१ मिलीमीटर तर सांताक्रुझमध्ये १३६२.८ मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद करण्यात आली आहे. गेल्या पाच वर्षातील कुलाब्यातील हा दुसऱ्या क्रमांकाचा पाऊस आहे अशी माहिती मिळाली आहे.

- Advertisement -

सतत पाऊस पडण्याची कारणं

कर्नाटक ते केरळच्या किनारपट्टीवर ढगांची असलेली स्थिती, तर गुजरातजवळ निर्माण झालेली चक्रीय वादळाची स्थिती, बंगालच्या उपसागराजवळ निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा या सर्व कारणांमुळं मुंबईमध्ये पावसाचा जोर वाढला असून पुढील ३ दिवस हा जोर असाचा कायम राहणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. पावसानं अजिबात विश्रांती न घेतल्यामुळं मुंबईमध्ये ठिकठिकाणी पाणी तुंबलं असून रेल्वे आणि अन्य वाहतुकीवरदेखील त्याचा परिणाम झाला आहे. तर मुंबईला पाणीपुरवठा करणारा तुळशी तलाव सोमवारी भरून वाहू लागला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -