घरताज्या घडामोडीतबेल्यातील मलमूत्रामुळे दहिसर नदीचे पात्र पुन्हा प्रदुषित

तबेल्यातील मलमूत्रामुळे दहिसर नदीचे पात्र पुन्हा प्रदुषित

Subscribe

दहिसर नदीही पुनर्जिवित करण्याचा प्रयत्न होत असतानाच या नदीमध्ये तबेल्यांमधील गाई-म्हशींचे शेण आणि मलमूत्र मोठ्याप्रमाणात सोडण्यात येत आहे. यामुळे नदी प्रदुषित होत असल्याने स्थानिकांसह पर्यावरण प्रेमींकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

मुंबई महापालिकेच्या वतीने मिठी नदीसह दहिसर नदीही पुनर्जिवित करण्याचा प्रयत्न होत असतानाच या नदीमध्ये तबेल्यांमधील गाई-म्हशींचे शेण आणि मलमूत्र मोठ्याप्रमाणात सोडण्यात येत आहे. यामुळे नदी प्रदुषित होत असल्याने स्थानिकांसह पर्यावरण प्रेमींकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. मागील सात वर्षांपासून याबाबत पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून याची दखल न घेतल्याने अखेर पर्यावरण प्रेमींसह स्थानिकांनी ‘रिव्हर मार्च’ च्या माध्यमातून गोबर मोर्चा काढून महापालिकेला जोरदार दणका दिला. त्यामुळे नदीत जाणारे जनावरांचे मलमूत्र न थांबवल्यास भविष्यात महापालिकेवर मोर्चा काढला जाईल, असा इशारा या संस्थेने दिला आहे.

पर्यावरण प्रेमींचा महापालिकेला दणका

मुंबई महापालिकेच्या माध्यमातून दहिसर नदीसह ओशिवरा, पोयसर, वाकोला आदी नद्यांचे रुंदीकरण करून त्या पुनर्जिवित करण्यात येत आहे. दहिसर नदीचे रुंदीकरण केल्यानंतर नदीच्या पात्रात पाणी शुद्ध करण्यासाठी ‘रिव्हर मार्च ’संस्थेच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न केला जात आहे. महापालिकेनेही यासाठी सल्लागाराची नियुक्ती केली आहे. परंतु, कोट्यवधी रुपये खर्च करूनही या नदीच्या पात्रात जनावरांचे मलमुत्र सोडले जाते. परिणामी नदीचे पात्र प्रदुषित होत आहे.

- Advertisement -

महापालिकेवर मोर्चा काढणार

बोरीवली नॅशनल पार्क समोरच्या ओम कारेश्वर मंदिरच्या मागे असलेल्या दहिसर नदीच्या पात्रात तबेल्यातून जनावरांचे शेण आणि मूत्र मोठ्या प्रमाणात सोडण्यात येत होते. त्यातून निर्माण होणार्‍या मिथेलीन वायूमुळे नदीशेजारी राहणार्‍या आणि शाळेत शिकणाऱ्या लहान मुलांच्या मेंदू आणि आरोग्यावर दुष्परिणाम होतात. याबाबत गेली सात वर्षे पाठपुरावा करूनही मुंबई महापालिका प्रशासन आणि संबंधित प्रशासनाकडून कारवाई होत नव्हती. याबाबीकडे लक्ष वेधण्यासाठी ‘रिव्हर मार्च टिम’च्या वतीने पर्यावरण प्रेमी नागरिक, स्वयंसेवी आणि सामाजिक संस्थांच्या मदतीने नॅशनल पार्क येथून महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला होता. परंतु, हा मोर्चा महापालिकेच्या प्रवेशद्वाराजवळ रोखण्यात आला. तब्बल दोन मोर्चेकर्‍यांनी याठिकाणी ठिय्या आंदोलन केल्यानंतर आर-मध्य विभागाच्या सहायक आयुक्त भाग्यश्री कापसे यांनी या शिष्टमंडळाची भेट घेतली.

शिष्टमंडळासोबत झालेल्या या चर्चेत तबेला मालकांवर सक्त कारवाई करण्याचे आदेश कापसे यांनी संबंधित अधिकार्‍यांना दिले. तसेच तबेल्यातून सोडण्यात येणारे गाई म्हशींचे मलमूत्र झडप लावून बंद करून दहिसर नदीत येणार नाही, याकरता आवश्यक बाबींची पुर्तता करण्यात येईल, असेही आश्वासन दिले. कापसे यांच्या समाधानकारक आश्वासनानंतर मोर्चा मागे घेण्यात आला असून जर एक महिन्यामध्ये याबाबत सकारात्मक कारवाई न झाल्यास १ मार्च रोजी विशाल मोर्चा महापालिकेवर काढला जाईल, असा इशाराही रिव्हल मार्चने दिला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – करोना व्हायरस – उपचार घेणाऱ्या मुंबईतील तिघांना डिस्चार्ज


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -