घरताज्या घडामोडीराज्यसभेच्या ७ जागांसाठी लॉबिंग सुरु; लवकरच होणार निवडणुकीची घोषण

राज्यसभेच्या ७ जागांसाठी लॉबिंग सुरु; लवकरच होणार निवडणुकीची घोषण

Subscribe

महाराष्ट्र विधानसभेतून राज्यसभेवर गेलेल्या सात खासदारांची मुदत येत्या २ एप्रिल रोजी संपत असून या जागेवर आता कोणाची वर्णी लागते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या निकालांनंतर नव्या राजकीय पर्वाला सुरुवात झाली असून आता सर्वांचे लक्ष दिल्लीवर लागून राहिले आहे. दिल्लीत महाराष्ट्र विकास आघाडीचे काय होते याबाबत गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेला सुरुवात झाली आहे. त्यामुळेच आता सर्वांचे लक्ष आगामी काळात होऊ घातलेल्या राज्यसभेच्या निवडणुकीवर लागून राहिलले आहे. महाराष्ट्र विधानसभेतून राज्यसभेवर गेलेल्या सात खासदारांची मुदत येत्या २ एप्रिल रोजी संपत असून या जागेवर आता कोणाची वर्णी लागते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. विशेष म्हणजे, भाजपकडून या जागांसाठी कोणाला संधी देण्यात येते, याबबत आतापासून उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

महाराष्ट्रातून राज्यसभेवर ७ खासदार निवडून गेलेले आहेत. ज्यात भाजपाच्या कोट्यातून निवडून आलेले रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले, भाजपाच्या पाठिंब्यावर राज्यसभेवर गेलेले अपक्ष संजय काकडे, भाजपाचे अमर साबळे, काँग्रसचे हुसेन दलवाई, शिवसेनेचे राजकुमार धूत, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, अ‍ॅड. माजीद मेमन यांचा समावेश आहे. या सातही सदस्यांची मुदत येत्या २ एप्रिल रोजी संपत आहे. त्यामुळे या पदांसाठी आतापासून सर्वच राजकीय पक्षांची लॉबिंग सुरु झाली आहे. पण, राज्यातील सध्याचे राजकीय बलाबल लक्षात घेता या सात जागांपैकी सातव्या जागेसाठी जोरदार चुरस पहायला मिळणार आहे. या सातव्या जागेसाठी आघाडी सरकारमधील तिन्ही पक्षांना अपक्षांची पाठ थोपटावी लागणार आहे. विशेष म्हणजे भाजपाचे सर्व खासदार आणि त्यांचे विधानसभेतील पक्षीय बलाबल लक्षात घेता सहज निवडून येतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

- Advertisement -

भाजपाकडे अपक्षांसह ११५ आमदारांचे संख्याबळ

विधानसभा निवडणूकीत भाजपाचे १०५, शिवसेनेचे ५६, राष्ट्रवादी काँग्रसेचे ५४, काँग्रेस ४४, मनसे १, सपा २, शेकाप १, बहुजन विकास आघाडी ३ तसेच अपक्ष मिळून २८८ आमदार जिंकून आलेले आहेत. अपक्षांच्या पाठिंब्यावर महाराष्ट्र विकास आघाडीकडे १७० आमदारांचे तर भाजपाकडे अपक्षांसह ११५ आमदारांचे संख्याबळ आहे. राज्यात सत्ता स्थापन करताना आघाडी सरकारने समान कार्यक्रम ठरवला आहे. त्यानुसार आगामी राज्यसभेची निवडणूकही एकत्रितपणे लढण्याचा निर्धार सरकारने केला आहे. राज्यसभेच्या ७ जागांचा विचार केल्यास प्रत्येकाला किमान विधानसभेतील ३७ आमदारांची मते मिळणे अपेक्षित असणार आहे. त्यामुळे तिन्ही पक्षांचा प्रत्येकी १ खासदार तर भाजपाचे ३ खासदार सहज जिंकून येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, राष्ट्रवादीकडून शरद पवार यांना पुन्हा एकदा संधी दिली जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात असून शिवसेनेकडून विशेषत भाजपाकडून या जागांसाठी कोणाचा विचार केला जाईल, याबाबत अनेक तर्कविर्तक लढविले जात आहेत.


हेही वाचा – बारामतीच्या जवळ असलेल्या नेत्यांची इंदिरा गांधीवर टीका – आशिष शेलार


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -