Wednesday, April 14, 2021
27 C
Mumbai
घर मुंबई covid-19 रूग्णांना थेट बेड दिले जाणार नाहीत, प्रभाग वॉररूममधूनच रूग्णालयातील बेड्सचे नियोजन

covid-19 रूग्णांना थेट बेड दिले जाणार नाहीत, प्रभाग वॉररूममधूनच रूग्णालयातील बेड्सचे नियोजन

परवानगीशिवाय रुग्णांना बेड मिळणार नाही - चहल

Related Story

- Advertisement -

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. नागपूर, पुणे या जिल्ह्यात कोरोनाचा पुन्हा उद्रेक झाला आहे. आरोग्य विभाग, आयसीएमआर, राज्य सरकारने सोमवारी राज्यातील सर्व रुग्णालयांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आदेश जारी केले आहेत. यामध्ये खासगी रुग्णालयांना १०० टक्के तर शासकीय रुग्णालयांना ८० टक्के खाटा आरक्षित ठेवण्याचे आदेश दिले आहेत. खासगी हॉस्पिटलमधील आयसीयू आणि अन्य खाटांवरही सरकारचे नियंत्रण राहणार आहे. परवानगीशिवाय कोविड व्यतिरिक्त अन्य अजाराच्या रुग्णांना आयसीयू बेड देताना परवानगी घेणे अनिवार्य असणार आहे. लक्षणे न आढळणाऱ्या कोरोना रुग्णांनाही रुग्णालयात दाखल करण्यासाठी सरकारची परवानगी घ्यावी लागणार आहे. तसेच रुग्णांना आता थेट बेड दिले जाणार नाहीत. असे मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी म्हटले आहे.

कोरोनाची लक्षणे नसलेलेले कोरोनाबाधित रुग्ण आणि इतर आजार असलेले रुग्ण परस्पर खासगी रुग्णलयात प्रवेश घेत आहेत. या गोष्टीला लगाम घालण्यात आला आहे. त्यामुळे आता रुग्णालयांना अशा रुग्णांना प्रवेश देताना वॉर्ड रुमकडे परवानगी घ्यावी लागणार आहे.

- Advertisement -

सर्व खासगी सार्वजनिक रुग्णालयांच्या बेड्‌सचे नियोजन आता प्रभागातील वॉररुममधूनच होणार आहे. तसेच सर्व रुग्णालयातील खाटा ताब्यात घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. लक्षणे न आढळलेल्या कोरोनाबाधित रुग्णांना परवानगीशिवाय प्रवेश दिला जाऊ नये. खासगी रुग्णालयातील ८० टक्के खाटा आणि १०० टक्के आयसीयू बेड राखीव ठेण्यात आल्या आहेत. हे बेड वॉर्ड रुमच्या परवानगीशिवाय रुग्णांना न देण्याचे आदेश दिले गेले आहेत. तसेच कोरोना रुग्णांच्या उपचाराचा दर हा समान आणि प्रशासनाने विहित केल्याप्रमाणे आकारण्यात यावा, या दराच्या अधिक दर आकारला गेल्यास संबंधित रुग्णालयावर कारवाई करण्यात येणर आहे. सर्व रुग्णालयांतील कोरोना रुग्णांचे बिलांचे पालिका प्रशासनामार्फत ऑडिट करण्यात येणार आहे.

वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रुग्णालयांत सर्व सोयी- सुविधा उपलब्ध आहेत की नाही याचा आढावा घेण्यात येणार आहे. रुग्णालयात व्हेंटिलेटर,ऑक्सिजन गॅस,बेड या सर्वांचा आढावा घेण्यात येणार आहे. तसेच रुग्णालयात पीपीई किट,मास्क, अन्य किट्स आणि संसाधनांचा साठा करुन ठेवण्याचे आदेश आरोग्य विभागाकडून देण्यात आले आहेत.

परवानगीशिवाय रुग्णांना बेड मिळणार नाही – चहल

- Advertisement -

मुंबईतील रुग्णालयात २२६९ कोविड बेड आणि ३६० आयसीयू बेड खासगी रुग्णालयात उपलब्ध करण्यात आले आहेत. कोरोना रुग्णांसाठी सध्या मुंबईत ३००० खाटा रिक्त आहेत यामध्ये ४५० खाटा खासगी रुग्णालयातील आहेत. तसेच जम्बो कोविड सेंटरमध्ये १५०० खाटा उपलब्ध करण्यात येणार आहेत. आठवड्याच्या शेवटपर्यंत ७००० खाटां उपलब्ध करण्यात येणार असल्याचे मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी म्हटले आहे. कोणत्याही रुग्णालयात परवानगीशिवाय रुग्णांना प्रवेश घेता येणार नाही. रुग्णालयांच्या खाटांचे वाटप फक्त कोविड वॉर्ड रुमद्वारे करण्यात येणार आहेत. त्यामुळे कोणीही खासगी लॅबकडून कोरोना चाचणी करु नये अन्यथा त्यांना बेड शोधण्यासाठी अनेक अडचणी येतील. चाचणी केल्यावर कोरोना रुग्णांची माहिती आम्हाला मिळते यानंतर कोरोनाबाधित रुग्णाला घेण्यासाठी रुग्णाच्या घरी पथक जाते. त्यामुळे या प्रणालीचेच सर्वांनी पालन करावे अशी माहिती महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिली आहे.

- Advertisement -