घरमुंबईवांद्रे भाभा, सांताक्रूझ देसाई आणि जोगेश्वरी ट्रामा केअर खासगी आयसीयू

वांद्रे भाभा, सांताक्रूझ देसाई आणि जोगेश्वरी ट्रामा केअर खासगी आयसीयू

Subscribe

खासगी संस्थेच्या माध्यमातून ५० आयसीयू बेड्स वाढवणार

मुंबई महापालिकेच्या उपनगरी रुग्णालयांमध्ये आयसीयू रुम्सची कमतरता भासत असल्याने आता खासगी संस्थांच्या माध्यमातून आयसीयुंची संख्या वाढवली जात आहे. यामध्ये चार टप्प्यांमध्ये एकूण २०० बेड्स वाढवले जाणार असून पहिल्या टप्प्यात वांद्रे भाभा, सांताक्रुझ व्ही.एन.देसाई आणि जोगेश्वरी ट्रामा केअर सेंटर आदी तीन रुग्णालयांमध्ये एकूण ५२ आयसीयू बेड्स खासगी संस्थेच्या माध्यमातून वाढवले जाणार आहेत.

मुंबई महापालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये खासगी संस्थांकडून आयसीयू बेड्सची सेवा उपलब्ध करून घेण्यासाठी दीड वर्षांपूर्वी स्थायी समितीने दप्तरी दाखल केलेला प्रस्ताव पुन्हा एकदा गटनेत्यांच्या सभेपुढे मंजुरीसाठी ठेवण्यात आलेला आहे. महापालिकेच्या उपनगरीय रुग्णालयांत तातडीच्या व गंभीर आजारावरील उपचारांसाठी अतिदक्षता विभागात दाखल होणार्‍या रुग्णांना या रग्णालयांतील तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपलब्धतेअभावी दूरवरच्या प्रमुख रुग्णालयात स्थानांतरित करावे लागू नये व उपनगरातील नागरिकांना आवश्यक तातडीने वैद्यकीय उपचार उपनगरातील महापालिकेच्या नजीकच्या रुग्णालयांत उपलब्ध व्हावेत तसेच महापालिकेच्या प्रमुख रुग्णालयांचा भार हलका व्हावा या बाबींचा विचार करत अतिदक्षता विभागात विशेषज्ञ डॉक्टरांचा आयसीयू सेवा बाहेरील संस्थांच्या माध्यमातून सुरू करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे.

- Advertisement -

6 कोटींचे कंत्राट

यासाठी एकूण ६ कोटी ८६ लाख २० हजार रुपयांचे दोन वर्षांचे कंत्राट करण्यात येणार आहे. उपनगरीय रुग्णालयांपैकी १२ उपनगरी रुग्णालयांमध्ये खासगी संस्थांच्या माध्यमातून विशेषज्ञ डॉक्टरांच्या सहायाने एकूण २०० बेड्सची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, त्यापैकी पहिल्या टप्प्यातील वांद्रे भाभा, सांताक्रुझ व्ही.एन.देसाई आणि जोगेश्वरी हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रामा केअर सेंटर या तीन रुग्णालयांसाठी खासगी संस्थांकडून निविदा मागवण्यात आल्या होत्या. त्यामध्ये या तिन्ही रुग्णालयांसाठी जीवन ज्योत चॅरिटेबल ट्रस्टने कमी बोली लावून पात्र ठरली होती . मात्र, तिन्ही रुग्णालयांसाठी संस्थेने अनुक्रमे २१५० रुपये, १७०० रुपये, आणि १८०० रुपये एवढा दर प्रति पाळी व प्रति बेडसाठी आकारला होता. त्यामुळे या तिन्ही रुग्णालयांमध्ये विशेषज्ञ डॉक्टरांसह आयसीयू बेड्ससाठी सेवा देण्यासाठी जीवन ज्योत चॅरिटेबल ट्रस्टला काम देण्याचा प्रस्ताव पुन्हा गटनेत्यांच्या सभेपुढे मान्यतेसाठी ठेवला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -