घरमुंबईआयडॉल प्रवेशाचा सर्व्हर डाऊन

आयडॉल प्रवेशाचा सर्व्हर डाऊन

Subscribe

विद्यार्थी हैराण, मुदत वाढवून देण्याची केली मागणी

प्रतिनिधी: मुंबई विद्यापीठाची आर्थिक घडी नीट बसावी यासाठी विद्यापीठाचे सर्व लक्ष आता आयडॉलच्या प्रवेश प्रक्रियेवर आहे. मात्र या आयडॉलच्या सर्व्हर गोंधळामुळे विद्यार्थ्याच्या प्रवेशासमोर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आयडॉलचे ऑनलाइन प्रवेश घेताना विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असून याविरोधात आता विद्यार्थी भारतीने आक्रमक पवित्रा धारण केल्याचे चित्र सोमवारी दिसून आले. तर या सर्व्हर गोंधळामुळे विद्यापीठ देखील चिंतेत असून यामुळे आर्थिक फटका बसण्याची भिती विद्यापीठ प्रशासनाकडून वर्तविण्यात आली आहे.

मुंबई विद्यापीठाच्या प्रवेशासाठीच्या संकेतस्थळावर अनेक अडचणी येत आहेत. प्रवेज अर्ज भराताना मध्येच साईट बंद होणे असे प्रकार होत आहेत. विद्यार्थ्यांचे अर्ज भरले जात नसून अनेकदा विद्यार्थ्यांना तासन तास अर्ज भरण्यासाठी वाट पहावी लागत आहेत. विद्यार्थी अर्ज भरू शकले नाहीत अशातच अनेकांची ऑनलाइन अर्ज भरण्याची मुदत संपली. त्यामुळे नवीन प्रवेश घेऊ इच्छणार्या विद्यार्थ्यांचे नुकसान होऊन त्यांना प्रवेशाला मुकावे लागले आहे अशी तक्रार विद्यार्थी भारती संघटनेच्या राज्य कार्यवाह साक्षी भोईर यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

तर मुंबई विद्यापीठाच्या आयडॉल या संकेतस्थळाचा सर्व्हर डाऊन असल्यामूळे जर विद्यार्थ्यांना प्रवेशाला मुकावे लागत असेल तर हा विद्यार्थ्यांचा दोष नाही त्यांना संधी द्यावी अशी मागणी विद्यार्थी भारतीच्या पूजा मुधाने यांनी सांगितले. अर्ज भरण्याची मुदत वाढवावी असे पत्रक विद्यार्थी भारताने विद्यापीठाला दिले असून तसे न केल्यास विद्यार्थी भारती तीव्र आंदोलन करेल असा इशारा अध्यक्षा मंजिरीं धुरी यांनी दिला आहे. ज्या विद्यार्थ्यांना संकेतस्थळावर अर्ज भरताना तसेच प्रवेश पूर्ण करताना अडचणी निर्माण झाल्या आहेत त्या विद्यार्थ्यांनी अर्ज आयडॉल विभागाला करावा, त्या विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याची संधी दिली जाईल अशी माहिती विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी विनोद मळाले यांनी दिली.

राष्ट्रवादीने दिला टाळेलावा आंदोलनाचा इशारा

मुंबई विद्यापीठाच्या गेल्यावर्षीच्या परीक्षेत नापास झालेले तब्बल ३५ हजार विद्यार्थी पुनर्मुल्यांकनात पास झाल्याचे प्रकरण नुकतेच उजेडात आले होते. याविरोधात अनेक विद्यार्थी संघटनांनी परीक्षा विभागावर टीकेची झोड उठविल्यानंतर आता राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने याप्रकरणाची न्यायालनीय चौकशी करण्याची मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष अ‍ॅड अमोल मातेेले यांनी केली आहे. यामागणीसाठी त्यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यासह कुलगुरु डॉ. सुहास पेडणेकर यांना निवेदन दिले आहे. ही मागणी वेळीच पूर्ण न केल्यास विद्यापीठाला टाळेलावा आंदोलन छेडण्यात येईल, असे थेट इशारा मातेले यांनी यावेळी दिला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -