घरमुंबईपालिका शिक्षण मंडळांनी शाळांकडे लक्ष द्यावे

पालिका शिक्षण मंडळांनी शाळांकडे लक्ष द्यावे

Subscribe

मागणीसाठी मनविसेचा महापालिकेवर मोर्चा

उल्हासनगर मनपामधील शिक्षणमंडळात होत असलेल्या गैरकारभारविरुद्ध मनविसेच्या वतीने मुख्यालयावर मोर्चा काढण्यात आला. शुक्रवारी सकाळी 11 वाजता शिवाजी चौक, कँप 3 ते उल्हासनगर महानगर पालिकेवर या मोर्चात मनसेचे नेते, पदाधिकारी व पालकांचा यात सहभाग होता. मनपा मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर घोषणाबाजी करण्यात आली.
मनविसे शहराध्यक्ष मनोज शेलार यांच्या पुढाकाराने आयोजित या मोर्चाचे नेतृत्व मनसे नेते शैलेश शिर्के, मनसे शहराध्यक्ष बंडू देशमुख, यांनी केले. तर, उपजिल्हाप्रमुख संजय घुगे, गणेश आठवले, अशोक गरड, सचिन चौधरी, सुनील शेलार, रवी अहिरे, रवी सोनवणे आदी उपस्थित होते.

उल्हासनगरातील अनेक शाळा मोडकळीस आलेल्या आहेत. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वेळेवर मिळत नाही. हलक्या दर्जाचे साहित्य दिले जाते. खोटी पटसंख्या दाखवून शैक्षणिक साहित्यामध्ये घोटाळा केला जात आहे. बेकायदेशीररित्या कनिष्ठ कर्मचार्‍यांना बढती दिली जात आहे. अनेक शाळांमध्ये पिण्याच्या पाण्याची सोय नाही. अग्निरोधक यंत्रणेचाही अभाव आहे. त्यामुळे दुर्घटना झाल्यास कोण?
-मनोज शेलार, मनविसे, अध्यक्ष उल्हासनगर

- Advertisement -

मनविसेच्या शिष्टमंडळासोबत माझी चर्चा झाली असून त्यांनी जे काही आरोप केले आहेत त्यांची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल.
-संतोष देहरकर, उपायुक्त, उल्हासनगर मनपा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -