घरमुंबईउल्हासनगरात बेकायदा बांधकामांना लोकप्रतिनिधींचा आशिर्वाद

उल्हासनगरात बेकायदा बांधकामांना लोकप्रतिनिधींचा आशिर्वाद

Subscribe

उल्हासनगर – येथील बेकायदा बांधकामांना विविध पक्षातील राजकीय नेते आणि लोकप्रतिनिधींचाच आशिर्वाद असल्याने महापालिका कारवाई करण्यास धजत नसल्याचे चित्र आहे. उल्हासनगर महापालिकेत भाजप, टिम ओमी कलानी आणि साई पक्षाची सत्ता आहे. तसेच राज्यातील सत्ताधारी भाजपा नगरसेवकांनी मनमानी कारभार करून बेकायदा बांधकामांना अभय दिले आहे. त्यामुळे कारवाईसाठी गेलेल्या महापालिका अधिकाऱ्यांवर दबाव आणून कारवाई थांबवली जात असल्याची माहिती प्रभाग अधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर दिली.

साई पक्षाच्या नगरसेविका आणि प्रभाग समिती ३ च्या सभापती कांचन रमेश लुडं यांचे पती रमेश लुंड आणि मुलगा कैलाश रमेश लुंड हे आपल्या प्रभाग समितीत स्वतः अनधिकृत बांधकामे करतात. तसेच आपल्या प्रभागात होत असलेल्या कामांची तक्रार करतात. आणि अनधिकृत वसूली करतात. असा आरोप रा. काँ. विद्यार्थी संघटनेचे नरेश गायकवाड यांनी केला आसून तसे पत्र आयुक्त गणेश पाटील यांना दिले आहे. या मुळे सभापती कांचन रमेश लुंड ह्या वादात सापडल्या आहेत. पक्ष प्रमुख जिवन ईदनानी काय निर्णय घेतात या कडे शहरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

नगरसेविका आणि त्यांचा पक्षाला तसेच लुंड परिवाराला बदनाम करण्याचे हे षडयंत्र आहे. मी किंवा माझ्या मुलाने माझ्या सभापती असलेल्या पत्नींचे नाव खराब होईल , असे कृत्य कधी केले नाही. करणार नाही.
– सभापतीचे पती रमेश चैनानी

- Advertisement -

मात्र हे शहर विस्थापितिंचे
इथे सामाजिक बांधिलकी केवळ सिंधी उच्च पदस्त नागरिकां साठी वापरली जाते. ते कितीही नालायक असतील, चोर असतील त्यांना वाचविण्या साठी विस्थापित शहरातील प्रस्थापित अखंड प्रयत्न करणार .जे फाईल चोर भाजपा स्विकृत नगरसेवका बाबत झालं, तेच या प्रभाग समिती सभापती बाबत होणार ?

Rashmi Manehttps://www.mymahanagar.com/author/rashmi/
गेल्या ११ वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय. प्रिंट, डिजीटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. मनोरंजन, सामाजिक, सांस्कृतिक विषयांवर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -