घरमुंबईएमएमआरडीएतील कंत्राटी कामगारांना मिळणार भरपाईची सुरक्षा

एमएमआरडीएतील कंत्राटी कामगारांना मिळणार भरपाईची सुरक्षा

Subscribe

बांधकाम आणि नाका कामगारांसाठी महाराष्ट्रात बोर्ड निर्माण करण्यात आले असून असुरक्षित व कंत्राटी बांधकाम कामगारांचा अपघात झाला वा मृत्यू झाल्यास त्याला बोर्डाच्या माध्यमातून भरपाई दिली जाते. असाच फायदा आता मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने आपल्या प्रकल्पातील कंत्राटी कामगारांना द्यायचे ठरवले आहे. याचा फायदा एमएमआरडीएच्या मेट्रो प्रकल्पातील कंत्राटी कामगारांना मिळणार आहे.
मुंबईमध्ये मेट्रो प्रकल्पांची अमंलबजावणी युध्दपातळीवर सुरू आहे. या प्रकल्पामध्ये कामगारांना काही अपघात झाल्यास त्यामुळे मृत किंवा जखमी झालेल्या कामगारास नियमानुसार कंत्राटदारामार्फत विमा कंपनीकडून भरपाई मिळते. दिल्ली मेट्रो रेल्वे महामंडळामध्ये अशी परिस्थती उद्भवल्यास कंत्राटदारांने दिलेल्या भरपाई व्यतिरिक्त अधिक रक्कम त्या कामगारास अथवा त्याच्या परिवारास दिली जाते.
यासाठी दिल्ली मेट्रोरेल्वे महामंडळाने कामगार कल्याण निधी तयार केला असून त्यात जमा होणारी रक्कम ही कंत्राटदारांकडून आकारण्यात येणाèया दंडातून जमा केली जाते. हा निधी उभारण्याचा हेतू मृत कामगारांच्या परिवारास किंवा जखमी झालेल्या कामगारास आर्थिक मदत करणे हा आहे. याचाच आधार घेत मुं.म.प्र.वि.च्या मेट्रो प्रकल्पातील कंत्राटी कामगारांसाठी कल्याण निधी स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मुंबईमध्ये मेट्रो प्रकल्पांची अमंलबजावणी युध्दपातळीवर सुरू आहे. या प्रकल्पांमध्ये सुरक्षा, आरोग्य व पर्यावरणाबाबत असुरक्षित परिस्थिती उद्भवल्यास कंत्राटदारास आर्थिक दंड करण्याची तरतूद करण्यात आहे. एमएमआरडीएने यासाठी कामगार कल्याण निधीची स्थापना केली आहे. या कामगार कल्याण निधीत कंत्राटदारांनी पैसे जमा करायचे आहेत. कंत्राटदारांना प्रथम जीवघेण्या आपघाताकरिता रू 5 लाख इतका दंड आहे. तर पुढील प्रत्येक जीवघेण्या अपघातकरीता 10 लाख रूपये दंड आकारण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त हा निधी कामगारांच्या सुरक्षा, आरोग्य, पर्यावरण, जागृरूकता प्रशिक्षण आरोग्य तपासणीसाठी वापरण्यात येणार आहे. ही मदत विमा कंपन्याकडून मिळणाèया भरपाई व्यतिरिक्त असेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -