घरमुंबईबेकायदा रेती वाहतूक दोन ट्रक एक टेम्पो जप्त

बेकायदा रेती वाहतूक दोन ट्रक एक टेम्पो जप्त

Subscribe

सात जणांवर फौजदारी गुन्हा

तालुक्यातील खारबांव मंडळ विभागातून चोरटी रेती, खडी वाहतूक करणारे दोन ट्रक आणि एक टेम्पो महसूल विभागाने कारवाई करत ताब्यात घेतला. याप्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची माहिती तहसीलदार शशिकांत गायकवाड यांना मिळाली होती. त्यांनी मंडळ अधिकारी भास्कर टाकवेकर, तलाठी गणेश पाटील आदींना तात्काळ कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार मंडळ अधिकारी टाकवेकर यांच्या मार्गदर्शनखाली महसूल पथकाने वडूनवघर रेती बंदरावर धाड टाकली. त्या ठिकाणी एका बोलेरो पिकअप टेम्पोत 50 हजार किमतीची 1 ब्रास अवैध रेती भरून ती चोरट्या मार्गाने विक्रीसाठी घेऊन जात असल्याचे आढळून आले. यावेळी रेती वाहतुकीसाठी लागणारा महसूल विभागाकडील गौणखनिजाचा परवाना टेम्पोचालक जुबेर आरबी खान याच्याकडे नसल्याचे आढळून आले. त्याने कल्याण रोड येथील रेती विक्रेता दुकानदार मेहफुज खान याच्या सांगण्यावरून वडूनवघर रेती बंदर येथून रेती भरून ती विक्रीसाठी घेऊन जात होता. त्यामुळे टेम्पोचालक जुबेर, दुकानदार मेहफूज तसेच अवैध रेती भरून देणारा प्लॉट मालक अशा तिघांवर रेती वाहतूकप्रकरणी गुन्हा दाखल केला.

याशिवाय पाये गावाच्या हद्दीत दोन आयवा ट्रकमध्ये 1 लाख 35 हजार 8 रुपये किमतीची विना रॉयल्टी 8 ब्रास खडी भरून ती छुप्या मार्गाने विक्रीसाठी घेऊन जात असल्याचे आढळून आले. यात 50 लाख किमतीचे आयवा ट्रक जप्त करून चालक तारनाथ कुरुमुल यादव, फुलेमान मुलतान अंसारी व ट्रक मालक सुरेश जोशी, कबीर प्रायर आदींवर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -