घरमुंबईठाण्यात ३७ हजार ३६१ मूर्तींचे विसर्जन

ठाण्यात ३७ हजार ३६१ मूर्तींचे विसर्जन

Subscribe

अनंत चर्तुदर्शी ठाणे येथे ३७ हजार ३६१ मूर्तींचे विसर्जन करण्यात आले आहे.

पर्यावरणभिमुख गणेशोत्सवाची संकल्पना राबविणाऱ्या ठाणे महापालिकेतर्फे निर्माण करण्यात आलेल्या पर्यायी गणेश विसर्जन व्यवस्थेतंर्गत अनंत चर्तुदर्शी दिवशी एकूण ६ हजार १९० गणेशमर्तीचे विसर्जन करण्यात आले. दरम्यान दीड दिवस, सात दिवस आणि दहा दिवस असे मिळून एकूण ३७ हजार ३६१ मूर्तींचे विसर्जन करण्यात आले आहे.

या ठिकाणी करण्यात आले बाप्पाचे विसर्जन

अनंत चर्तुदर्शी दिवशी ठाणे महापालिका क्षेत्रातील विसर्जनस्थळांवर घरगुती आणि सार्वजनिक असे एकूण ६ हजार १९० गणेशमूर्तींचे महापालिकेच्या सुव्यवस्थित नियोजनामध्ये विसर्जन संपन्न झाले. यात घरगुती ५ हजार ५७४ गणेशमूर्ती, ४८२ सार्वजनिक गणेशमूर्ती आणि ३६ गौरीमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. तर महापालिकेच्या गणेशमूर्ती स्वीकार केंद्रामध्ये प्राप्त झालेल्या एकूण ९८ गणेश मूर्तींचे महापालिकेच्या वतीने विधीवत विसर्जन करण्यात आले आहे. मासुंदा तलावामध्ये ४४४ घरगुती श्री गणेश मुर्तीचे विसर्जन करण्यात आले. अहिल्यादेवी होळकर विसर्जन घाट येथे २१८ घरगुती, ११ सार्वजनिक गणेशमूर्ती, खारेगांव तलाव येथे ३८५ घरगुती, ९ सार्वजनिक गणेशमूर्ती, मीठबंदर घाट येथे १६८ घरगुती, २४ सार्वजनिक गणेशमूर्ती, आंबेघोसाळे तलाव येथे १३१ घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले आहे.

- Advertisement -

रायलादेवी घाट १ येथे ४५९ घरगुती गणेशमूर्ती, रायलादेवी घाट २ येथे ५७८ गणेशमूर्ती, कोलशेत घाट १ येथे ५२ घरगुती गणेश मूर्ती, कोलशेत घाट २ येथे ४९३ घरगुती गणेशमूर्ती ११३ सार्वजनिक गणेशमूर्ती, १६ गौरीमूर्ती, रेवाळे तलाव येथे २१८ घरगुती गणेश मूर्ती १६ सार्वजनिक गणेशमूर्ती, मुल्लाबाग येथे २४३ घरगुती गणेशमूर्ती ७ सार्वजनिक गणेशमूर्ती, खिडकाळी तलाव येथे १४७ घरगुती गणेशमुर्ती, २ सार्वजनिक गणेशमूर्ती, ४ गौरीमूर्ती, दिवाघाट येथे ४०१ घरगुती गणेशमूर्ती ३६ सार्वजनिक गणेशमूर्ती, पारसिक घाट येथे ७३५ घरगुती गणेशमूर्ती, ९८ स्वीकृत गणेशमुर्ती, १८४ सार्वजनिक गणेशमुर्ती, आत्माराम पाटील घाट येथे ८४ घरगुती गणेशमुर्ती , १६ सार्वजनिक गणेशमुर्ती, शंकर मंदिर तलाव येथे ११३ घरगुती गणेशमुर्ती, २६ सार्वजनिक गणेशमूर्ती, उपवन तलाव येथे ७०५ घरगुती गणेशमूर्ती, ३८ सार्वजनिक गणेशमूर्ती, १६ गौरीमूर्तींचे विसर्जन करण्यात आले आहे.


हेही वाचा – सीवूडमध्ये विसर्जनावेळी ७ जणांना विजेचा धक्का; तिघांची प्रकृती चिंताजनक

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -