घरमुंबईभिवंडीत रुग्ण दुपटीचा कालावधी वाढला, आयुक्तांच्या नियोजनाला यश!

भिवंडीत रुग्ण दुपटीचा कालावधी वाढला, आयुक्तांच्या नियोजनाला यश!

Subscribe

चारसूत्री नंतर कोरोना काही प्रमाणात आटोक्यात आणण्यात आयुक्त डॉ पंकज आशिया यांना यश

यंत्रमाग उद्योग नगरीमुळे दाटीवाटीने वास्तव्य करणाऱ्या कामगार मजुरांची लोकसंख्या अधिक असलेल्या भिवंडी शहर. महाराष्ट्रात खास करून मुंबई पुणे ठाणे कल्याण येथे झपाट्याने कोरोना संसर्ग पसरत असताना भिवंडी शहरातील पहिला रुग्ण १२ एप्रिल रोजी आढळून आला. मात्र भिवंडीत चारसूत्रीची कार्यक्रमानंतर आयुक्तांच्या नियोजनाला यश आले आहे.

१२ एप्रिलनंतर मे अखेरी पर्यंत रुग्ण वाढ अत्यंत संथ गतीने सुरु होऊन ११९ रुग्णांना लागण होत ६ जणांचा मृत्यु झाला . या पैकी बहुसंख्य रुग्ण इतर शहरातील कोरोना संसर्ग परिसरातुन अथवा हॉस्पिटल मधून लागण होऊन आले होते . परंतु त्या नंतर अन लॉक सुरु झालेल्या जून महिना १८२२ रुग्णांना लागण होऊन १०३ जणांचा मृत्यु झाला. शहरातील रुग्णांना आरोग्य सेवा देण्यात महानगरपालिका प्रशासन कमी पडत असल्याची ओरड लोकप्रतिनिधी नागरीक यांच्याकडून होत होती. महानगरपालिका प्रशासन फक्त कागदावरील आराखडे बनविण्यात मश्गुल राहिले शहरातील रुग्णांना ऑक्सीजनचा वेळीच पुरवठा न होणे, रुग्णवाहिका न मिळणे, रुग्णवाहिका चालकांकडून रुग्णांची आर्थिक पिळवणूक, खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करून न घेणे अशा विविध समस्या उभ्या राहिल्याने शहरातील चाचणी न झालेल्या परंतु या काळात मृत्यु झालेल्यांचे प्रमाण सुध्दा वाढले. शहरातील कब्रस्तानात दररोज बारा ते पंधरा मृतदेह दफन होत असतानाच एकमात्र शासकीय रुग्णालयावर भिस्त असल्याने स्वयंसेवी संस्थांनी ऑक्सिजन सेंटर उभारून रुग्णांना उपचार मिळवून देण्याचा प्रयन्त केला .

- Advertisement -

चार सूत्री कार्यक्रमातून आले यश

प्रशासनाचे प्रमुख म्हणून तत्कालीन आयुक्त डॉ प्रवीण आष्टीकर यांची अपयशी कारकिर्दीचा शेवट नारळ देऊन केला. मालेगाव येथे कोरोना संसर्ग आटोक्यात यशस्वी ठरलेले भारतीय प्रशासकीय सेवेतील डॉ पंकज आशिया यांच्या हातीआयुक्त पदाची सूत्रे २० जून रोजी सोपविली. त्यानंतर त्यांनी शहरातील आरोग्य सुविधांचा आढावा घेत चार सूत्री कार्यक्रम आखला.  यामध्ये सर्वप्रथम रुग्णालय व्यवस्थापन या गोष्टीवर लक्ष केंद्रित करून महानगरपालिका प्रशासनाने जी खाजगी रुग्णालये कोव्हिड रुग्णालय म्हणून जाहीर केली ती सुरु करणे, जे रुग्ण आढळून येत असताना त्यांच्या निकट संपर्कात येणाऱ्या व्यक्तींची अलगीकरण करून तात्काळ तपासणी, चाचणी तपासणीचा वेग वाढवीत घरोघरी जाऊन सर्वेक्षणावर भर दिल्याने जे संशयित रुग्ण उपचार करवून घेत नव्हते अशांचा शोध घेता आला. आजार बाबतचे समाजतील गैरसमज दूर करण्यासाठी धार्मिक सेवाभावी संस्थांची मदत, शहरात प्रतिबंधित क्षेत्र यांची कडक अंमलबजावणी या चार सूत्री कार्यक्रमातून १ जुलै नंतर या उपाययोजनांचा परिणाम दिसू लागला तो म्हणजे रुग्ण वाढ मंदावली तर उपचार मिळू लागल्याने शहरातील मृत्यु दर घटला.

१५ जुलै पर्यंत ९६३ रुग्ण वाढ झाली तर ४५ जणांचा मृत्यु झाला. जून मध्ये असलेला रुग्ण वाढ दुपटीचा वेग आठ दिवसांचा होता तो आज २४ दिवसांवर पोहचला असून ६.३ टक्के असलेला मृत्यु दर ४१ टक्क्यांवर येऊन ठेपला आहे. या काळात शहरात तब्बल २५ रुग्णवाहिका उपलब्ध झाल्याने रुग्णवाहिका न मिळाल्याने होणारी तगमग थांबली तर सुरूवातीला ऑक्सिजन नसल्याने रुग्ण दगावत असल्याचे बोलले जात असल्याने शहरात स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने रुग्णांना ऑक्सिजन देण्याची वेळ आली. शुक्रवार ९ जुलै रोजी खुदाबक्ष सभागृह या ठिकाणी सुरु केलेल्या १३६ ऑक्सिजन युक्त बेड उपलब्ध झाले असताना सध्या त्या ठिकाणी अवघे ३० रुग्ण दाखल नसल्याने शहरातील रुग्ण संख्या मंदावली का, असा प्रश्न उपस्थित होत आहे .

तब्बल २००० बेड सध्या नागरिकांसाठी उपलब्ध असून सध्या तीन ठिकाणी अँटीजेन चाचणी सुविधा उपलब्ध करून दिल्याने मागील दहा दिवसात ११७३ रुग्णांची तपासणी केली असता त्यापैकी २३९ पॉझिटिव्ह तर ९३४ निगेटिव्ह आढळून आले आहेत समाधानाची बाब म्हणजे नागरिक ही तपासणी करवून घेण्यास पुढे येत असल्याने परिस्थितीत समाधानकारक सुधारणा होताना दिसत आहे.

– आयुक्त डॉ पंकज आशिया यांनी दिली आहे .

- Advertisement -

कोरोनाच्या भीतीने शहरातील असंख्य डॉक्टर्स मंडळींनी रुग्णालय, दवाखाने बंद करून घरी बसल्याने नागरिकांना कोरोनाची लक्षणे दिसत असताना इतर आजारावर उपचार मिळू शकले नाहीत हे सत्य कोणी नाकारणार नाही, आज शहरात तब्बल २८ ठिकाणी स्वयंसेवी संस्था यांनी सुरु केलेल्या मोहल्ला क्लिनिक मधून परिसरातील नागरिकांवर उपचारास सुरवात झाल्याने कमी लक्षणे असलेले रुग्ण तात्काळ बरे होऊ लागले आहेत, आज आरोग्य सेवा सक्षम करण्यात आयुक्त डॉ पंकज आशिया यशस्वी जाले असल्यानेच शहरातील नागरिकांनासाठी आजच्या घडीला तब्बल १५९ बेड असलेली चार हॉस्पिटल उपलब्ध झाली आहेत त्या व्यतिरिक्त ११ खाजगी रुग्णालयातील डीडीकेटेट कोव्हिड हेल्थ सेंटर मधून १५७ बेड तर टाटा आमंत्रण सह राईस हायकूल, ओसवाल हॉल येथील कोव्हिड केअर सेंटर मधून १०८८ बेड उपलब्ध असून शहरातील नागरिकांना गरज पडल्यास मुंबई, ठाणे येथील शासकीय रुग्णालयात हि काही बेड राखीव आहेत.


कोरोना नंतरची ‘कोविड’ कम्युनिटी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -