घरमुंबईसरबत बंदीनंतर शीतपेयांच्या विक्रीत विक्रमी वाढ

सरबत बंदीनंतर शीतपेयांच्या विक्रीत विक्रमी वाढ

Subscribe

रेल्वे स्थानकांमधील स्टॉलधारकांचे दररोज हजारो रुपयांचे नुकसान

मध्य रेल्वेवर लिंबू सरबत बंदी घातल्यामुळे रेल्वे स्थानकावरील खाद्यपदार्थ स्टॉलवरून सेव्हन अप, निम्बूझ, निबू दास आणि लेमन यांसारख्या अनेक शीतपेयांची मोठ्या प्रमाणात विक्री वाढली आहे. रेल्वेच्या लिंबू सरबत बंदीमुळे एकीकडे मध्य रेल्वेच्या खाद्यपदार्थ स्टॉलधारकांना मोठा आर्थिक फटका बसत असून त्यांचे दररोज शेकडो रुपयांचे नुकसान होत आहे. तर दुसरीकडे मध्य रेल्वेच्या प्रवाशांना लिंबू सरबतासाठी जास्त पैसे मोजून महागडी शीतपेय विकत घ्यावी लागत आहेत.

वाढत्या उन्हामुळे सर्वांचेच पाय लिंबू सरबताकडे वळत असतात. नुकतेच कुर्ला रेल्वे स्थानकावर घाणेरड्या पद्धतीने लिंबू सरबत बनविण्याचा व्हिडिओ वायरल झाला होता. त्यानंतर उसळलेल्या जनक्षोभानंतर झोपी गेलेल्या मध्य रेल्वेला जाग आली. तत्काळ मध्य रेल्वेच्या स्थानकांवरील खाद्य पदार्थाच्या स्टाल्सवर मिळणार्‍या लिंबू सरबत आणि कालाखट्टावर तत्काळ बंदी घालण्यात आली. मात्र याचा थेट फटका मध्य रेल्वेच्या २४४ खाद्यपदार्थ स्टॉलधारकांना बसला आहे. यापैकी सर्वाधिक आर्थिक नुकसान दादर, कुर्ला, घाटकोपर, ठाणे आणि कल्याण या मोठ्या स्थानकांवर दिसून आला आहे. लिंबू सरबत बंदी होण्यापूर्वी मध्य रेल्वे स्थानकांवरील स्टॉल्सवर लिंबू सरबत ५, कोकम ५ रुपये अशा स्वस्त दरात मिळत होते. मात्र लिंबू सरबतावरील बंदीमुळे आता प्रवाशांना पाचपट पैसे देऊन महागडी शीतपेय विकत घ्यावी लागत आहेत. त्यामुळे याचा फटका मध्य रेल्वेच्या प्रवाशांना बसला आहे.

- Advertisement -

दादर रेल्वे स्थानकावरील एक खाद्यपदार्थ स्टॉलधारकांनी दिलेल्या माहितीनुसार, लिंबू सरबत बंदीनंतर शीतपेयामध्ये सर्वाधिक विक्री सेव्हन अप, निंबू दास, निबू फ्रेश आणि लेमनची विक्री होत आहे. बंदी आगोदर एक दिवसाला अर्धा बॉक्स खाली व्हायचा, मात्र आता ३ बॉक्स जात आहेत. सध्या उकाड्याचे दिवस आहे, त्यातच लिंबू सरबत बंदीमुळे या शीतपेयाची विक्री वाढली आहे. मात्र लिंबू सरबत बंदीमुळे प्रत्येकी स्टॉलधारकांना आज सरासरी ४ ते ५ हजार रुपयांचे नुकसान होत आहे.

सरबत बंदीनंतर लूटमार

मध्य रेल्वेच्या खाद्यपदार्थ स्टाल्समधील लिंबू सरबतावरील कारवाईमुळे त्यांचा धंदा बसला असला तरी, शीतपेयामधून ग्राहकांची काही स्थानकांवर सध्या लूटमार सुरु आहे. विशेष म्हणजे अनोळखी व्यक्तींना २० रुपयांचे शीतपेय २५ रुपयांत विकण्याचे प्रकार सध्या होत आहेत. ऐन उन्हाळ्यात प्रवाशांना रेल्वेच्या लिंबू सरबत बंदी फतव्याचा परिणाम भोगावा लागत आहे, अशी प्रतिक्रिया दैनिक ‘आपलं महानगर’ला प्रवासी सय्यद शकील यांनी दिली.

- Advertisement -

रेल्वे स्थानकांच्या खाद्यपदार्थ स्टॉलवर फक्त ५ रुपयांत लिबू सरबत उपलब्ध होते. मात्र मध्य रेल्वेने एक व्हिडियो व्हायरल होताच सर्व स्टॉलवरून लिंबू सरबत बंद केल्याने आज आम्हाला महागडे शीतपेय घावे लागत आहे. रेल्वेनी लिंबू सरबतसाठी पर्याय उपलब्ध करून द्यावा.
– विनायक मंचेकर, प्रवासी

मध्य रेल्वेने एका व्हिडियोमुळे एवढी मोठी कारवाई करणे चुकीचे आहे. ज्यांनी हा घाणेरडापणा केला, त्यांच्यावर कारवाई करावी आणि लिंबू सरबत पुन्हा सुरु करावेत.
– रोहित जानसकर, प्रवासी

स्टॉलवरच्या शीतपेयांचे दर

लिंबू सरबत –
कोकम –
पाईन ऍपल – १० रु.
मँगो ज्यूस – १०
मोसंबी ज्यूस – १०

शीतपेय उत्पादक कंपन्यांचे दर

सेव्हन अप निम्बूझ – २५
निंबू दास – २०
निंबू फ्रेश – २०
लॅमन – २०
जीरा मसाला – २५
मँगो दास – २०
हंसराज मँगो फ्रेश –२०
फिज्ज – ४०

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -