घरमुंबईवरळीजवळ समुद्रात बोट बुडाली; एक जण बेपत्ता

वरळीजवळ समुद्रात बोट बुडाली; एक जण बेपत्ता

Subscribe

मुंबईतील वरळीजवळील समुद्रात बोट बुडाली असून त्यातील सहा जणांना वाचवण्यात आले आहे. तर एक जण बेपत्ता असल्याची माहिती समोर येत आहे.

मुंबईतील वरळीजवळील समुद्रात बोट बुडाली असून त्यातील सहा जणांना वाचवण्यात आले आहे. तर एक जण बेपत्ता असल्याची माहिती समोर येत आहे. आज, सोमवारी सकाळी अकरा वाजताच्या सुमारास ही घटना घडली असून याबाबत माहिती मिळाल्यानंतर तटरक्षक दलानं तातडीनं बचावकार्य हाती घेतले. तर एकाचा हेलिकॉप्टर आणि बोटीच्या मदतीनं शोध घेण्यात येत आहे.

- Advertisement -

यापूर्वी दोनदा बोट बुडाल्यांच्या घटना 

वरळीजवळच्या समुद्रात सकाळी अकराच्या सुमारास टग रेवती नावाची बोट बुडाली. यासंदर्भात माहिती मिळताच, तटरक्षक दलानं अमर्त्या बोटीच्या मदतीनं बुडालेल्या बोटीतील प्रवाशांना वाचवण्यासाठी मोहीम हाती घेतली. शर्थीच्या प्रयत्नानंतर सहा जणांना वाचवण्यात तटरक्षक दलाला यश आलं. सर्व जण सुरक्षित असून, त्यांना प्रथमोपचार देण्यात आले. या दुर्घटनेत एक प्रवासी बेपत्ता झाला आहे. तटरक्षक दलाच्या दोन बोटी आणि हेलिकॉप्टरच्या मदतीनं त्याचा शोध घेण्यात येत आहे. यापूर्वी मुंबईत दोन बोट बुडाल्यांच्या ताज्या घटना आहेत. गेल्या वर्षी गणपती विसर्जनावेळी लालबागच्या राजाचे विसर्जन करण्यासाठी गेलेली बोट बुडाली होती. त्यामध्ये बुडालेल्या एका ५ वर्षीय मुलाचा मृतदेह दोन दिवसांनी सापडला होता. तर शिवस्मारकाच्या पाहणीसाठी गेलेली बोट देखील पाण्यात बुडाली होती. यामध्ये पुण्यातील एका कार्यकर्त्याचा मृत्यू झाला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -