घरताज्या घडामोडीIT department Raid : अनिल परब अडचणीत येणार ? आयटीच्या धाडीत कोणत्या...

IT department Raid : अनिल परब अडचणीत येणार ? आयटीच्या धाडीत कोणत्या गोष्टीचा खुलासा ?

Subscribe

आयकर विभागाने अनिल परब यांच्याशी संबंधित अशा दापोली रिसॉर्टच्या धाडीच्या निमित्ताने एक प्रसिद्धी पत्रक जारी केले आहे. या प्रसिद्धी पत्रकात आयकर विभागाने थेट अनिल परब यांचे नाव घेतले नसले, तरीही महाराष्ट्रातील एक प्रमुख राजकारणी व्यक्ती असा उल्लेख केला आहे. या रिसॉर्टच्या निमित्ताने झालेल्या व्यवहाराच्या नोंदीच्या निमित्ताने काही गोष्टी आयटीने आपल्या पत्रकात नमून केल्या आहेत. त्यामुळे रिसॉर्ट प्रकरणातील व्यवहारामुळे अनिल परब हे अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

आयकर विभागाने काही महत्वाच्या ठिकाणी धाडी टाकल्या होत्या. आयटी विभागाने या सर्च ऑपरेशनच्या निमित्ताने प्रसिद्धीपत्क काढले आहे. कशा पद्धतीच्या धाडी होत्या. काही दिवसांपूर्वी केबर ऑपरेटर, सरकारी कर्मचारी तसेच राजकारणी व्यक्तीच्या सी ए च्या घरी धाडी टाकल्या होत्या. एकुण २६ ठिकाणी या धाडी मुंबई, पुणे, सांगली आणि रत्नागिरी परिसरात टाकण्यात आल्या होत्या. या धाडीमध्ये एका महाराष्ट्रातील बड्या राजकीय व्यक्तीच्या नावे दापोली येथे जमीनीचा व्यवहार २०१७ साली तब्बल १ कोटी रूपयांना झाला असल्याचे आढळले आहे. पण या जागेच्या व्यवहाराची नोंद ही २०१९ साली झाली. त्यानंतर ही जमीन २०२० मध्ये १.१० लाखांना एका दुसऱ्या व्यक्तीला विकण्यात आली. त्याच जागेवर नंतर रिसॉर्ट बांधण्यात आले. या राजकारणी व्यक्तीच्या नावावर ही जागा होईपर्यंत रिसॉर्टचे काम पूर्ण झाले होते.

- Advertisement -

ही जागा नंतर राजकारणी व्यक्तीने एका केबल ऑपरेटरला २०२० मध्ये विकली. या जागेच्या व्यवहारासाठी २०१९ आणि २०२० मध्ये फक्त जागेच्या नोंदणीसाठी स्टॅम्प ड्युटी मोजण्यात आली होती. या रिसॉर्टचे बांधकाम हे २०१७ मध्ये सुरू झाले होते. तर या बांधकामासाठी ६ कोटी रूपये मोजण्यात आले होते. या बांधकामाचा खर्च त्या जमीन खरेदी करणाऱ्या व्यक्तीने किंवा राजकारणी व्यक्तीनेही त्यांच्या कोणत्याच नोंदीत नमुद केलेला नाही.

एका सरकारी अधिकाऱ्याच्या झालेल्या चौकशीत पुणे, सांगली, बारामती याठिकाणी गेल्या दहा वर्षांमध्ये अनेक ठिकाणी जमीन खरेदीचे व्यवहार केल्याचे निष्पन्न झाले आहे. या कुटुंबाने पुण्यात एक फार्म हाऊस, तासगाव येथे फार्म हाऊस आणि सांगलीत दोन बंगले खरेदी केल्याचे समोर आले आहे. तसेच तनिष्क आणि शोरूमसाठीही मोठ्या प्रमाणात खर्च केल्याचे आढळले आहे. तसेच १०० कोटी रूपयांची जमीन खरेदी ही गेल्या ७ वर्षात झाल्याचेही समोर आले आहे. या कुटुंबानेच अनेक व्यवसाय असून त्यामध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तु आणि तनिष्क शो रूमचाही समावेश आहे. तसेच रिअर इस्टेट आणि पाईप मॅन्युफॅक्चरींगमध्येही या कुटुंबाच्या व्यवसायाचा समावेश आहे. या व्यक्तीच्या नातेवाईकांकडूनच हे सगळे व्यवसाय चालवण्यात येतात. तसेच सरकारकडून अनेक कंत्राटेही या व्यक्तीला मिळाल्याचे आढळले आहे. बोगस खरेदी आणि बोगस पावत्यांच्या आधारे २७ कोटींचा खर्च दाखवण्यात आल्याचे आढळले आहे. तसेच २ कोटींचा हिशोब नसल्याचेही समोर आले आहे. या संपूर्ण सर्च ऑपरेशनमध्ये ६६ लाखांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. तसेच डिजिटल डेटा, डॉक्युमेंटरी एव्हिडन्सही तयार करण्यात आले आहेत. या प्रकरणात आणखी तपास सुरू असल्याचे आयटी विभागाने स्पष्ट केले आहे.

- Advertisement -

 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -