घरताज्या घडामोडीतीन शहरांमध्ये आयटीच्या धाडी, हिरानंदानी ग्रुपची २४ ठिकाणं टार्गेटवर

तीन शहरांमध्ये आयटीच्या धाडी, हिरानंदानी ग्रुपची २४ ठिकाणं टार्गेटवर

Subscribe

रियल इस्टेट क्षेत्रात अग्रस्थानी असलेल्या नामांकित हिरानंदानी ग्रुपच्या मुंबईसह इतर शहरातील ठिकाणांवर आज आयटीने धाडी घातल्या आहेत. सकाळपासून सुरू झालेले हे धाडसत्र अजून सुरू आहे. आयटीच्या अधिकाऱ्यांनी आतापर्यंत हिरानंदानी ग्रुपच्या मुंबई, चेन्नई आणि बंगळुरू या शहरांमधील २४ ठिकाणांवर धाड घातली आहे. यादरम्यान, कंपनी परिसर, कार्यालय आणि कंपनीतील मुख्य अधिकाऱ्यांच्या घरीही आयटीचे पथक पोहचले असून तेथेही तपास सुरू आहे.

- Advertisement -

विशेष म्हणजे आयटीने मुंबईबरोबरच देशातील वेगवेगळ्या ठिकाणीही धाडी घातल्या आहेत. अनेक मोठे बिल्डर्स आयटीच्या रडारवर आहेत. याचपार्श्वभूमीवर मुंबई आणि ठाण्यासह देशातील अनेक भागात आज सकाळपासूनच ही छापेमारी सुरू आहे. मुंबई आणि ठाण्यातील सर्वात मोठ्या बिल्डर्समध्ये हिरानंदानी ग्रुपचा समावेश आहे. यामुळे आयटीने सर्वप्रथम हिरानंदानी ग्रुपच्या ठिकाणांना लक्ष्य केलं आहे.

 ईडीची नवाब मलिकांच्या ठिकाणांवर धाड

- Advertisement -

तर दुसरीकडे ईडीनेही आज मनी लॉंड्रींग प्रकरणी जेलमध्ये असलेले अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या कुर्ला येथील ठिकाणांवर छापे मारले. मलिक यांना ४ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. ते ऑर्थर रोड तुरुंगात असून त्यांच्यावर कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीम आणि मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणाशी संबंधित व्यक्तींकडून कवडीमोल भावाने जमिनी खरेदी केल्याचा आरोप आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -