घरमुंबईमुलानेच केला आईचा घात; जुहूतील महिलेचे प्रेत सापडले नेरळ - माथेरान घाटात

मुलानेच केला आईचा घात; जुहूतील महिलेचे प्रेत सापडले नेरळ – माथेरान घाटात

Subscribe

मयत विना गोवर्धन कपूर (७४) जुहु येथील गुलमोहर रोड क्रमांक ५ येथील कल्पतरु सोसायटीमध्ये आपला धाकटा मुलगा सचिन गोवर्धन कपूर (४५) याच्या सोबत राहत होती. तर मोठा मुलगा अमेरिकेत स्थायिक असून या महिलेचे वयोमान जास्त आणि आजारपण असल्याने या महिलेच्या सेवेसाठी नोकरही होता. मात्र मुलगा सचिन दररोज आई सोबत संपत्तीवरुन वाद घालत स्वत:च्या नावे संपत्ती करण्यासाठी तिच्याकडे तगादा लावत असे, मात्र मयत विना कपूर या गोष्टीला विरोध करत होती.

 

दिनेश सुतार, माथेरान

- Advertisement -

जुहू, मुंबई येथे राहणार्‍या एका महिलेचा पोटच्या मुलानेच घातपात करुन मंगळवारच्या आसपास मध्य रात्रीच्या सुमारास महिलेचे प्रेत नेरळ – माथेरान घाटात आणून टाकण्यात आले होते.या घटनेचा मुंबईतील जुहू पोलिसांनी काही तासात छडा लावत आरोपींच्या मुसक्या आवळल्या असून नेरळ माथेरान पोलिस आणि माथेरान सह्याद्री रेस्क्यु टिमच्या साह्याने घाट रस्त्याच्या शेजारील दरीत शोध घेऊन मृत महिलेचा मृतदेह बुधवारी रात्री उशीरा ताब्यात घेतला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

सदर घटनेतील मयत विना गोवर्धन कपूर (७४) जुहू येथील गुलमोहर रोड क्रमांक ५ येथील कल्पतरु सोसायटीमध्ये आपला धाकटा मुलगा सचिन गोवर्धन कपूर (४५) याच्या सोबत राहत होती. तर मोठा मुलगा अमेरिकेत स्थायिक असून या महिलेचे वयोमान जास्त आणि आजारपण असल्याने या महिलेच्या सेवेसाठी नोकरही होता. मात्र मुलगा सचिन दररोज आई सोबत संपत्तीवरुन वाद घालत स्वत:च्या नावे संपत्ती करण्यासाठी तिच्याकडे तगादा लावत असे, मात्र मयत विना कपूर या गोष्टीला विरोध करत होती. याचा राग अनावर झाल्याने सचिनने मंगळवारी, ६ डिसेंबरला वृद्ध आई सोबत जोरदार भांडण करत तिला बेसबॉल बॅटने मारहाण करुन तिची हत्या केल्याचे कबूल केल्याची प्राथमिक माहिती मिळते.
सदर घटनेचा अधिक तपास जहु पोलिस ठाण्याचे निरीक्षक एस. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरिक्षक बी. माने, व्ही धोत्रे, उप निरिक्षक. ए. पाटील,हेड कॉ्न्सटेबल तोडणकर,पोलीस नाईक मांडेकर,पोलीस कॉन्सटेबल. नप्ते पोलीस कॉन्सटेबल.ताकवले करत असून सदर घटनेचा गुन्हा जुहू,मुंबई पोलिस ठाण्यात गुन्हा कलम ३०२, ३४, २०१, अंतर्गत दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

मृतदेहाच्या विल्हेवाटीसाठी नोकराची मदत
सोसायटीतील सिक्युरीटी सुपरवायझर जावेद मापारी यांनी विना कपूर या हरविल्याची फिर्याद नोंदविल्याने जुहू पोलिसांच्या तपासात संपत्तीच्या वादामुळे तिच्या मुलावरच अधिक संशय बळावल्याने सदर घटनेची उकल झाली असल्याचे प्रथम दर्शनी समोर येत आहे. तर आईच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आपला नोकर लालुकुमार मंडल (२३) उर्फ छोटू याच्या मदतीने आईचा मृतदेह रेफ्रीजेटर सारख्या पॅकींगसाठी वापरण्यात येणार्‍या खोक्यात प्लॅस्टीकमध्ये गुंडाळला. अशा अवस्थेत आरोपींनी नेरळ-माथेरान घाटात नागरखिंडी जवळ पोलीसांना गुंगारा देण्यासाठी काही अंतरावर रिकामी खोका तर घाट रस्त्याच्या शेजारील दरीत प्लास्टिकमध्ये गुंडाळलेल्या अवस्थेतील मृतदेह झुडुपात फेकण्यात आला होता.

मृतदेह दरीतून बाहेर काढला
या मृतदेहाचा शोध घेण्यासाठी जुहू पोलिसांनी माथेरान पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शेखर लव्हे, नेरळ पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत शिंदे, पोलीस कॉन्टेबल बारगजे यांच्यासह माथेरान सह्याद्री रेस्क्यु टिमला मदतीसाठी पाचारण केले होते. यावेळी रेस्क्यु टिमचे वैभव नाईक, सुनिल ढोले, संदीप कोळी, दिनेश सुतार, अमित कोळी, अक्षय परब, सुनिल कोळी यांनी रात्री उशीरा पर्यंत शोध घेतल्यानंतर रात्री ११ वाजताच्या सुमारास विना कपूर यांचा मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात आला. या शोध मोहीमे दरम्यान नेरळ – माथेरान टॅक्सी संघटनेचे देखील मोलाचे सहकार्य मिळाले.याठिकाणी मिळालेला मृतदेह विना कपूर यांचाच असल्याचा संशय पोलिसांना आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -