घरमुंबईअखेर जयदत्त क्षीरसागर यांनी हरिभाऊ बागडेंकडे सोपवला आमदारकीचा राजीनामा

अखेर जयदत्त क्षीरसागर यांनी हरिभाऊ बागडेंकडे सोपवला आमदारकीचा राजीनामा

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रसचे आमदार जयदत्त क्षीरसागर यांनी अधिकृतरित्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यांनी मुंबईत विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांची भेट घेऊन त्यांच्याजवळ विधानसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयदत्त क्षीरसागर यांनी बुधवारी अधिकृतरित्या विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. क्षीरसागर यांनी मुंबईत विधानसभेचे अधयक्ष हरिभाऊ बागडे यांची भेट घेऊन अधिकृतरित्या त्यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला आहे. जयदत्त क्षीरसागर संध्याकाळी शिवसेना पक्षात प्रवेश करणार आहेत. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित क्षीरसागर शिवसेना भवन येथे पक्ष प्रवेश करणार आहेत.

संध्याकाळी शिवबंधनात अडकणार

जयदत्त क्षीरसागर हे भाजपमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा सुरु होती. मात्र गेल्या महिन्यात क्षीरसागर आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात बैठक झाली होती. ही बैठक उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानावर झाली होती. या बैठकीला बीडचे नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर आणि डॉ. योगेश क्षीरसागर उपस्थित होते. या बैठकीनंतर क्षीरसागर बंधू शिवसेनेत प्रवेश करणार, अशी चर्चा सुरु होती. आज अखेर त्यावर शिक्कामोर्तब होणार आहे. जयदत्त क्षीरसागर संध्याकाळी शिवबंधनात अडकणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -