घरमुंबईसात लाखांच्या चोरीप्रकरणी झारखंडच्या तरुणाला अटक

सात लाखांच्या चोरीप्रकरणी झारखंडच्या तरुणाला अटक

Subscribe

सुमारे सात लाख रुपयांच्या चोरीप्रकरणी पळून गेलेल्या झारखंडच्या एका तरुणाला मेघवाडी पोलिसांनी अटक केली. मोफाजुल हक हसीमाउद्दीन शेख ऊर्फ अब्दुल असे या 33 वर्षीय आरोपीचे नाव असून तो मूळचा झारखंडचा रहिवाशी आहे. सध्या तो रे रोड परिसरात राहत असून मासे विक्रीचे काम करीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

स्वप्नाली सुनिल शिर्के या महिलेचा जोगेश्वरी येथील मसाजवाडी, ठाकूर नगर, हेरेटाईज इमारतीसमोर शिर्के मच्छी सेंटर नावाचे एक दुकान आहे. त्यांना रत्नागिरी येथील गावी घराचे बांधकाम करायचे होते, त्यासाठी त्यांनी बँकेतून काही कॅश तसेच सोने गहाण ठेवून सात लाख रुपये आणले होते. 12 फेब्रुवारीला त्यांना गावी जायचे होते. त्यामुळे ते दुकानात पैसे मोजत होते. यावेळी तिथे अब्दुल हा त्यांच्या दुकानात मासे खरेदीसाठी आला होता. अब्दुल हा त्यांच्या परिचित असल्याने त्या त्याला दुकानात थांबवून अंडी आणण्यासाठी गेल्या होत्या. काही वेळाने ते दुकानात आले असता तिथे अब्दुल नव्हता. तसेच त्यांनी दुकानात ठेवलेले सात लाख रुपयेही गायब होते.

- Advertisement -

अब्दुल यानेच ही कॅश चोरी केल्याचे लक्षात येताच त्यांनी मेघवाडी पोलिसांत त्याच्याविरुद्ध तक्रार केली होती. गुन्हा दाखल होताच त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी शोधमोहीम सुरु केली हेाती. ही शोधमोहीम सुरु असतानाच अब्दुल हा रविवारी जोगेश्वरी परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर पोलिसांनी तिथे साध्या वेषात पाळत ठेवून अब्दुलला अटक केली. चौकशीत त्यानेच ही चोरी केल्याची कबुली दिली आहे. अटकेनंतर त्याला सोमवारी वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. लवकरच त्याच्याकडून चोरीची कॅश हस्तगत केली जाईल असे पोलिसांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -