घरदेश-विदेशदेशभरात मोदींच्या १०० पेक्षा जास्त प्रचार सभा

देशभरात मोदींच्या १०० पेक्षा जास्त प्रचार सभा

Subscribe

लोकसभा निवडणुकीसाठी मोदींच्या

लोकसभा निवडणुकीचं बिगुल काही दिवसांतच वाजण्याची शक्यता असून मार्चच्या पहिल्या आठवड्यात निवडणूक आयोगाकडून याबाबत घोषणा होण्याची शक्यता आहे. त्याआधीच आता सर्वच राजकीय पक्षांकडून निवडणुकीची जोरदार तयारी सुरू झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडूनही देशभरात मॅरेथॉन प्रचारसभा घेण्यात येणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान नरेंद्र मोदी देशभरात 100 पेक्षा जास्त सभा घेणार आहेत. भाजपची प्रचार समिती मोदींच्या याच सभांची रुपरेषा तयार करण्याच्या कामाला लागली आहे.

नरेंद्र मोदी तीन लोकसभा मतदारसंघात मिळून एक मोठी सभा घेतील, असं भाजपच्या प्रचार समितीत सहभागी असलेल्या एका मोठ्या नेत्यानं सांगितलं आहे. प्रचारसभांशिवायच देशातील अनेक मोठ्या शहरांमध्ये मोदींकडून रोड-शो करण्यात येईल, अशीही माहिती आहे.

- Advertisement -

मागच्या निवडणुकीत उत्तर प्रदेशात नरेंद्र मोदी यांची जादू मोठ्या प्रमाणात चालली होती. लोकसभेच्या 80 जागा असणारे हे राज्य निवडणुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे मोदींचा याही निवडणुकीत युपीवर फोकस असणार आहे. उत्तर प्रदेशात मोदी तब्बल 25 प्रचारसभा घेणार आहेत.

उत्तर प्रदेशसोबत पश्चिम बंगालमध्येही मोदींकडून विशेष जोर लावण्यात येणार आहे. कारण 2014 मध्ये जी लाट होती ती लाट यावेळी नाही याची जाणीव आता भाजपलाही झाली आहे. लोकसभेच्या सर्वाधिक 80 जागा असलेल्या उत्तर प्रदेशात भाजपला 2014 मध्ये 70 पेक्षा जास्त जागा मिळाल्या होत्या. तेवढ्या जागा मिळण्याची यावेळी शक्यता नाही त्यामुळे नुकसान होणार्‍या जागांची बेगमी इतर ठिकाणांवरून करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. त्यात पश्चिम बंगाल हे राज्य महत्त्वाचं आहे. नरेंद्र मोदी प. बंगालमध्ये 15 प्रचारसभा घेतील, अशी सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे ममता बॅनर्जींचा गड काबीज करण्यासाठी मोदींकडून जोरदार प्रयत्न होणार असल्याचं पाहायला मिळत आहे.

- Advertisement -

आगामी लोकसभा निवडणुकीत कोणाला सत्ता मिळणार यावर विविध तर्क लढवले जात आहेत. केंद्रात पुन्हा मोदींना संधी मिळेल की राहुल गांधी काँग्रेसला ऐतिहासिक विजय मिळवून देतील यावर अनेक जण मत व्यक्त करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -