घरदेश-विदेश'संध्याकाळी पेट्रोल-डिझेल घ्या, सकाळी विका'; आत्मनिर्भरतेवरून मोदी सरकारला टोला

‘संध्याकाळी पेट्रोल-डिझेल घ्या, सकाळी विका’; आत्मनिर्भरतेवरून मोदी सरकारला टोला

Subscribe

राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिमार्ण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केंद्र सरकारच्या आत्मनिर्भर मोहिमेची खिल्ली उडवली आहे. संध्याकाळी पेट्रोल-डिझेल विकत घ्या आणि सकाळी विका. आत्मनिर्भर व्हा, अशा शब्दांत जितेंद्र आव्हाड यांनी आत्मनिर्भर मोहिमेवरून मोदी सरकारला टोला लगावला आहे. यासंबंधी जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करून मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

काय म्हणाले जितेंद्र आव्हाड –

घर बसल्या पैसे कमवा. संध्याकाळनंतर पेट्रोल-डिझेल विकत घ्या आणि सकाळी विका. आत्मनिर्भर व्हा, असे ट्विट आव्हाड यांनी केले आहे. आव्हाड यांनी या ट्विटमध्ये पेट्रोल पंपावरील एक फोटोही पोस्ट केला आहे. या पेट्रोल पंपावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो असून त्यावर अक्कड बक्कड बंबे बो, ८०, ९० पूरे १०० असे लिहिले आहे. या फोटोवर आव्हाड यांनी या खोचक ओळी लिहिल्या आहेत. या आधी आव्हाड यांनी अभिनेता अक्षय कुमार, अमिताभ बच्चन आणि भाजप नेत्या स्मृती इराणी यांचे इंधन दरवाढीचे जुने ट्विट रट्विट करून त्यांनाही इंधन दरवाढीवरून प्रश्न विचारला आहे.

- Advertisement -

दरम्यान, आव्हाड यांनी अमिताभ बच्चन यांना अप्रत्यक्षपणे टोला लगावत विचारले की, तुम्ही पेट्रोल पंपावर कारमध्ये इंधन भरत नाहीत का? तुमच्या हातात येणारे इंधनाचे बिलही तुम्ही पाहत नाही का? आता तुम्ही बोललेच पाहिजे. हीच ती वेळ आहे. ती निश्चितच पक्षपाती नसाल. डिझेल आणि पेट्रोलचे दर गगनाला भिडले आहेत. अब मुंबईकर क्या करे कार जलाये या कार चलाये? आव्हाड यांनी अक्षय कुमार यांनाही इंधन दरवाढीवरून विचारले होते की, ‘अक्षय, तू ट्विटरवर सक्रिय नाहीस का?… तू कार वापरणं बंद केलंस का?… तू वर्तमानपत्र वाचत नाहीस का?… तुझ्या माहितीसाठी सांगतो की देशात पेट्रोल, डिझेलच्या किंमती प्रचंड वाढल्या आहेत’, असे आव्हाड यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते.

- Advertisement -

हेही वाचा –

देशात कोरोनाचा कहर; एका दिवसात ४१० जणांचा बळी, १९ हजारांहून अधिकांना संसर्ग

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -