घरCORONA UPDATEआत्मनिर्भर भारत हेच भारताचे लक्ष - पंतप्रधान नरेंद्र मोदी

आत्मनिर्भर भारत हेच भारताचे लक्ष – पंतप्रधान नरेंद्र मोदी

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी मन की बातमधून जनतेशी संवाद साधत आहेत. ‘मन की बात’चा त्यांचा हा ६६ वा एपिसोड आहे. कोरोनाच्या संकटामुळे काहींमध्ये ही चर्चा होत आहे की, हे संपूर्ण वर्षच चांगले नाही. २०२० हे वर्ष लवकर संपावे, असे म्हटले जात आहे. मात्र एक-दोन घटनांमुळे संपूर्ण वर्षाला दोष देणे योग्य नाही. भारतावर नेहमीच कठिण प्रसंग ओढवले आहेत. मात्र भारत दरवेळी संकटावर मात करून यशस्वी ठरला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ या रेडिओ कार्यक्रमाद्वारे देशवासियांशी संवाद साधला.

लडाख येथे भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये सुरू असणाऱ्या चकमकीबाबत पंतप्रधान मोदी यांनी चीनला इशारा दिला आहे. भारत संरक्षणक्षेत्रात पुढे जात आहे. भारत मैत्री करणे जाणतो आणि उत्तर देणे ही जाणतो. आम्ही जे काही करतो, ती देशसेवाच असते. आपला देश सक्षम आणि स्वावलंबी बनणे हीच शहिदांना खरी श्रद्धांजली ठरेल. भारतमातेकडे डोळेवर करून पाहणाऱ्यांना उत्तर मिळाले आहे. वीरपुत्रांच्या त्यागाचा आम्हाला अभिमान आहेत. या वीरपुत्रांचे माता-पिता धन्य आहेत, असे मोदी यावेळी म्हणाले.

- Advertisement -

लडाखमध्ये आपले जे वीर जवान हुतात्मा झाले. त्यांच्या शौर्यापुढे आज संपूर्ण देश नमन करतो आहे. श्रद्धांजली देतो आहे. संपूर्ण देश त्यांच्यासमोर कृतज्ञ आहे. नतमस्तक आहे. या वीरांच्या कुटुंबियांप्रमाणेच, प्रत्येक भारतीयाच्या मनात. त्यांना गमावल्याचे दुःख आहे. जगाने या काळात भारताच्या विश्वबंधुत्वाच्या भावनेचीही अनुभूती घेतली आणि त्याचसोबत आपल्या सीमांचे रक्षण करण्यासाठी भारताची ताकद आणि भारताची कटिबद्धता देखील आपण पहिली आहे. लडाखमध्ये भारताच्या भूमीकडे वाकड्या नजरेने बघणाऱ्या लोकांना चोख उत्तर मिळाले आहे, असे मोदींनी चीनला खडसावले. दरम्यान, या संकटाच्या काळात आपल्याला दोन गोष्टींवर भर द्यायचा आहे, कोरोनाला हरवायचे आहे आणि अर्थव्यवस्थेला अधिक मजबूत बनवायचे आहे. लॉकडाऊनपेक्षा जास्त सतर्कता आपल्याला अनलॉकच्या काळात बाळगायची आहे, असेही मोदी म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा –

कोरोनाचा हाहाकार; जगभरातील बाधितांचा आकडा १ कोटीपार!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -