घरमुंबई'काल झाड कापली उद्या विरोधकांना कापतील'

‘काल झाड कापली उद्या विरोधकांना कापतील’

Subscribe

रे आंदोलन हे जनतेचा हुंदका आहे, जनतेचा हुंकार आहे.

या सरकारकडे आईची माया नाही, बापाच ह्रदय नाही. काल झाड कापली उद्या हे असेच विरोधकांना कापतील. यामुळे येत्या निवडणुकीत हे सरकार घालवण्याची सुवर्णसंधी हातातुन दवडू नका, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.

- Advertisement -

असे हे निर्दयी सरकार गेलच पाहिजे

आरेमध्ये ज्या पद्धतीने हिंसा करण्यात आली, ज्या पद्धतीने अबोल पण पर्यावरणाला जिवंत ठेवणाऱ्या प्राणवायू देणाऱ्या झाडांची कत्तल झाली हा तुमच्या आमच्या आईबापावर चालविलेले सूरा होता, कुऱ्हाड होती. झाडांना उद्ध्वस्त केल्यावर जनतेमध्ये सरकार विरोधात सुरु झालेली अस्वस्थता, सरकारविरोधातली नाराजी लक्षात आल्याने सायंकाळी ६ नंतर जेलचे दरवाजे उघडत नसताना सर्वोच्च न्यायालयाचा आदेश येण्याअगोदर अचानक काल रात्री १२ वाजता आंदोलकांना सोडण्यात आले. हे सरकार निर्दयी आहे ही भावना जनतेच्या मनात निर्माण झाली आहे. त्याच्यातून हे सरकार झुकत चाललय. या सरकारला आईची माया नाही, बापाच हृदय नाही हे महाराष्ट्राला कळल पाहिजे, असे हे निर्दयी सरकार गेलच पाहिजे. हे सरकार घालवण्याची सुवर्णसंधी येत्या निवडणुकीत आली आहे. ती हातातून दवडू नका. आपण एकाधिकारशाहीकडे वाटचाल करतोय हे लक्षात घ्या. ही सुवर्णसंधी दवडलीत तर काल झाड कापली उद्या हे असेच विरोधकांना कापतील, हे लक्षात ठेवा, असा इशारा जितेंद्र आव्हाड यांनी दिला.

आरे आंदोलन हे जनतेचा हुंदका

रेल्वे कारशेडच्या नावाखाली आरे काॅलनीतली झाडे कापण्यास स्थगिती देऊन सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. पण मी याच्यावर खुश नाही. २० ऑक्टोबरला पुढील सुनावणी होणार आहे. पण २० ऑक्टोबरच का? तर महाराष्ट्रात २१ ऑक्टोबरला निवडणूक आहे. तोपर्यंत वातावरण शांत राहिल, आंदोलन शांत झाल तर सारच संपेल. जोपर्यंत आंदोलनाची धग नाही तोपर्यंत त्याची कोणी दखल घेत नाही. पब्लिक काय नावाची गोष्ट सर्वोच्च न्यायालयाने देखील मान्य केलीय. आरे आंदोलन हे जनतेचा हुंदका आहे, जनतेचा हुंकार आहे. हे अंर्तमनातून आले आहे. सर्वोच्च न्यायालयाही त्याच्यावर विचार करतय. यामुळे ही झाडे कशी तोडली हे संपूर्ण देशाला, महाराष्ट्राला कळण्यासाठी या तोडलेल्या झाडांचे ड्रोनने शूटींग झाल पाहिजे. पाडलेले प्रत्येक झाड शाप देणार आहे. झाडावरून पडलेले आणि मेलेले पक्षी यांना शाप देणार आहेत, असा संताप जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -