घरमुंबईहेल्मेट कारवाईदरम्यान पोलिसांवर हल्ला करणार्‍या ६ जणांना अटक

हेल्मेट कारवाईदरम्यान पोलिसांवर हल्ला करणार्‍या ६ जणांना अटक

Subscribe

जोगेश्वरीत हेल्मेटविरोधात धडक कारावई करण्यात आली. या कारवाई दरम्यान एक तरुण हेल्मेट न घालता दुचाकी चालवत होता. या तरुणाला दंड भरण्यास सांगितला असता त्यांनी धूम ठोकली. मात्र त्या तरुणास पकडण्यात पोलिसांना यश आले. मात्र या कारवाईदरम्यान पोलिसांवर हल्ला करणार्‍या सहाजणांना अटक करण्यात आली आहे.

हेल्मेट कारवाईदरम्यान पोलिसांवर झालेल्या हल्ला प्रकरणात सहा आरोपींना आंबोली पोलिसांनी अटक केली आहे. इम्रान सिद्धीकी, अब्दुल हमीद खरोदीया, हारुन नूरमोहम्मद खरोदीया, इस्माईल इब्राहिम खरोदीया, समीर रहिमतुल्ला सय्यद आणि शाहिना समीर सय्यद अशी या सहाजणांची नावे आहेत. अटकेनंतर या सहाही आरोपींना गुरुवारी दुपारी अंधेरीतील स्थानिक न्यायालयात पोलीस बंदोबस्तात हजर करण्यात आले होते. यावेळी त्यांना ५ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भारत गायकवाड यांनी सांगितले आहे.

जोगेश्वरीत हेल्मेटविरोधात कारवाई

वाहतूक पोलिसांसह स्थानिक पोलिसांना वरिष्ठांनी आपल्या पोलीस ठाण्यात हद्दीत हेल्मेट कारवाईचे आदेश दिले आहे. बुधवारी दुपारी आंबोली पोलिसांचे एक विशेष पथक जोगेश्वरी फाटक परिसरात हेल्मेट कारवाई करीत होते. यावेळी एका तरुणाने बाईक चालविताना हेल्मेट घातले नव्हते. हा प्रकार तिथे कर्तव्यावर असलेल्या पोलीस शिपाई सागर कोंडविलकर यांच्या निदर्शनास येताच त्याने त्याला थांबविले, त्याला हेल्मेट न घातल्याने दंड भरण्यास सांगितले. मात्र दंडाची रक्कम न भरता तो पळू लागला. यावेळी त्याला पाठलाग करुन पोलिसांन पकडले आणि दंड भरण्यास सांगितला. त्याचा राग आल्याने या तरुणाने त्यांच्या हातावर जोरात फटका मारला त्यामुळे ते जखमी झाले आहेत. त्यांच्या हातातून रक्तस्त्राव होऊ लागला. ते रक्त संबंधित तरुणाच्या शर्टावर पडल्याने तेथून जाणार्‍या काही लोकांना कोंडविलकर यांनीच या तरुणाला मारहाण केल्याचे वाटले होते.

- Advertisement -

त्यामुळे या ठिकाणी अचानक जमाव जमा झाला. या जमावाने पोलिसांशी हुज्जत घालून सरकारी कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे तिथे प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेनंतर तिथे आंबोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजानन सरगर हे त्यांच्या पथकासह रवाना झाले. यावेळी या जमावाने त्यांच्याशी हुज्जत घातली. पोलिसांना धक्काबुक्की करुन पोलिसांच्या वाहनाचे नुकसान केले होते. रात्री उशिरा आंबोली पोलिसांनी संबंधित आरोपींविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणून पोलिसांना धक्काबुक्की करणे. तसेच अन्य भादवी कलमांतर्गत गुन्हा नोंदविला होता. गुन्हा दाखल होताच रात्री उशिरा आणि सकाळी सहा आरोपींना वेगवेगळ्या परिसरातून पोलिसांनी अटक केली आहे. या गुन्ह्यांत ते सर्वजण सध्या पोलीस कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले असून याच जमावातील काही लोकांनी पोलिसांशी हुज्जत घालून त्याचे मोबाईलवरुन शुटींग केले आणि काही लोक पोलिसांना मारा असे चिथावणीखोर विधान करीत होते असे एका अधिकार्‍याने बोलताना सांगितले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -