घरमुंबईन्या. हरिशचंद्र पाटील मुंबई हायकोर्टाच्या मुख्य न्यायाधीशपदी

न्या. हरिशचंद्र पाटील मुंबई हायकोर्टाच्या मुख्य न्यायाधीशपदी

Subscribe

मूळचे लातूरचे असलेल्या न्या. हरिशचंद्र पाटील यांनी मुंबई विद्यापीठातून लॉचे पदवी शिक्षण पूर्ण केले आहे.

केंद्रीय न्याय मंत्रालयाद्वारे जारी करण्यात आलेल्या सूचनेनुसार, न्यायमूर्ती हरिशचंद्र पाटील यांची मुंबई उच्चन्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली. न्या. पाटील ऑगस्ट महिन्यापासून न्यायालयामध्ये कार्यकारी मुख्य न्यायाधीश म्हणून काम पाहत होते. न्या. पाटील हे मुंबई हायकोर्टाचे ४२ वे मुख्य न्यायाधीश बनले असून, डिसेंबर २०१७ मध्ये मुख्य न्यायाधीश मंजुला चेल्लुर यांच्या नियुक्तीनंतर १० महिन्यांनतर त्यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली. खरंतर न्यायमूर्ती वी.के. तहिलरामानी यांनी मुख्य न्यायाधीश चेल्लूर यांच्या सेवानिवृत्तीनंतर मुख्य कार्यवाहक न्यायाधीश म्हणून पदभार सांभाळला होता. मात्र, सात महिन्यांनतर मद्रास उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे ऑगस्ट महिन्यात न्या. पाटील यांनी मुंबई हायकोर्टाचे मुख्य कार्यकारी न्यायाधीश म्हणून पदभार सांभाळला.


वाचा: पुण्यात झोपडपट्टीत भीषण आग, दोघांचा मृत्यू

न्या. पाटील यांच्याविषयी थोडक्यात

न्या. हरिशचंद्र पाटील हे मूळचे लातूरचे असून, त्यांचा जन्म ७ एप्रिल १९५७ रोजी झाला. सरकारी लॉ कॉलेजमधून पाटील यांनी वकिलीचे शिक्षण घेतले. त्यानंतर १९७९ मध्ये त्यांनी मुंबई विद्यापिठातून वकिलीची डिग्री घेतली. त्यानंतर सुरुवातीचा काही काळ त्यांनी मुंबई उच्चन्यायालयाच्या औरंगाबाद बेंचवर वकिलीची प्रॅक्टिस केली.


सावधान: बँकांची Fake Apps चोरतात ग्राहकांचा डेटा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -