घरमुंबईअयोध्या दौऱ्यावरून कपिल सिब्बल यांचा एकनाथ शिंदेंवर निशाणा; बाळासाहेबांचा वारसा...

अयोध्या दौऱ्यावरून कपिल सिब्बल यांचा एकनाथ शिंदेंवर निशाणा; बाळासाहेबांचा वारसा…

Subscribe

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उपमुख्यमंत्री, काही आमदार आणि खासदारांसह दोन दिवसीय अयोध्या दौरा केला. मात्र राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपीटीने थैमान घातल्यामुळे शेतकरी हवालदिल आहे. त्यामुळे विरोधकांनी शिंदेंच्या दौऱ्यावर जोरदार टीका केली. यात आता ठाकरे गटाचे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल (kapil sibal) यांनी सुद्धा एकनाथ शिंदेंच्या अयोध्या दौऱ्यावर (Ayodhya tour) ट्विटरच्या माध्यमातून निशाना साधला आहे. त्यांनी म्हटले की, पाठीत वार करणारे बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा पुढे नेऊ शकत नाहीत, अशी टीका केली आहे.

कपिल सिब्बल म्हणाले की, भगवान रामाने त्याग, सत्य आणि प्रामाणिकपणा निवडला. बाळासाहेबांनीही श्रीरामाचे हे गुण आत्मसात केले. मात्र कारस्थानी, संधिसाधू आणि पाठीत वार करणाऱ्यांना बाळासाहेबांचा वारसा पुढे चालवता येणार नाही.

- Advertisement -

सत्तासंघर्षाचा निकाल राखून
दरम्यान उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात सुरू असलेल्या महाराष्ट्रातील राजकीय सत्तासंघर्षाचा युक्तीवादावर तब्बल 9 महिन्यानंतर सुनावणी पूर्ण झाली असून सर्वोच्च न्यायलयाच्या पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने निकाल राखून ठेवला आहे. ठाकरे गट आणि शिंदे गटाकडून न्यायालयात जोरदार युक्तीवाद करण्यात आला. ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल, अभिषेक मनुसिंघवी आणि देवदत्त कामतांनी युक्तिवाद केला, तर शिंदे गटाकडून हरिश साळवे, महेश जेठमलानी, नीरज कौल यांनी युक्तिवाद केला. त्यामुळे निकाल कोणाच्या बाजूने लागतो याकडे संपूर्ण देशांचे लक्ष लागून आहे.

- Advertisement -

‘भाजपाच्या पराभवासाठी विरोधक आघाडीच्या केंद्रस्थानी काँग्रेस असावी’
2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा (भाजपा) (BJP) सामना करणाऱ्या कोणत्याही युतीच्या केंद्रस्थानी काँग्रेस पाहिजे, असे स्पष्ट मत सिब्बल यांनी रविवारी केले आहे. त्यांनी सांगितले की, मजबूत आघाडीसाठी सर्व विरोधी पक्षांनी एकमेकांच्या विचारसरणीवर टीका करताना संवेदनशील राहिले पाहिजे. त्यामुळे भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला विरोध करणाऱ्या सर्व राजकीय पक्षांना प्रथम एक समान व्यासपीठ शोधण्याचे आवाहन, सिब्बल यांनी केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -