घरमुंबईकेईएम रुग्णालयात खाटांची संख्या घटली

केईएम रुग्णालयात खाटांची संख्या घटली

Subscribe

नव्या ऑक्सिजनयुक्त खाटांना लागतेय जास्त जागा

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने कोविड समर्पित तीन वॉर्डपैकी दोन वॉर्ड पुन्हा सर्वसामान्य रुग्णांसाठी उपलब्ध करून देण्याचा निर्णय केईएम रुग्णालयाने घेतला आहे. मात्र, या वॉर्डातील नव्या खाटा जुन्या खाटांपेक्षा मोठ्या व रुंद असल्याने या खाटांना अधिक जागा लागत आहे. त्यामुळे सर्वसाधारण रुग्णांसाठी असलेल्या खांटाची संख्या आधीपेक्षा 50 ते 75 खाटांनी कमी झाली आहे. त्यामुळे रुग्णांना दाखल करून घेताना डॉक्टरांसमोर समस्या निर्माण होत आहे.

केईएम रुग्णालयामध्ये कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजनयुक्त अद्ययावत खाटा महापालिका तसेच सामाजिक संस्थांकडून पुरवण्यात आल्या होत्या. यामुळे कोरोना रुग्णांची सोय झाली असली, तरी नव्या खाटा जागेच्या दृष्टीने अडचणीच्या ठरत आहेत. कोरोनाआधी ज्या वॉर्डात 75 जुन्या खाटा बसत होत्या. तिथेच केवळ 50 ऑक्सिजनयुक्त नव्या खाटा बसत आहेत. या तिन्ही वॉर्डमध्ये याआधी साधारणपणे 200 ते 225 खाटा बसत असताना नव्या खाटांची संख्या 150 वर आली आहे. परिणामी जवळपास 50 ते 75 खाटा कमी झाल्या आहेत. विशेष म्हणजे हे तिन्ही वॉर्ड हे मेडिसीन विभागाचे असून या विभागामध्ये दररोज मोठ्या प्रमाणात रुग्ण उपचारासाठी येत असतात. डॉक्टरांकडून खाटा उपलब्ध नसल्याचे सांगण्यात येत असल्याने रुग्णांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

- Advertisement -

केईएम रुग्णालयामध्ये कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजन युक्त अद्ययावत खाटा महापालिका किंवा काही सामाजिक संस्थांकडून पुरवण्यात आल्या. या खाटांमुळे कोरोना रुग्णांची सोय झाली असली तरी प्रत्यक्षात सर्वसामान्य रुग्णांच्या खाटा कमी झाल्या आहेत. परिणामी वॉर्डमध्ये उपचारार्थ दाखल करून घेण्यात येणार्‍या रुग्णांची संख्येत घट झाली आहे. सर्वसामान्य रुग्णांना दाखल करून घेण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे रुग्णांना खाटा उपलब्ध नसल्याचे कारण देण्यात येत असल्याने त्यांच्याकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील केईएम रुग्णालयातील तीन वॉर्ड हे कोविड समर्पित करण्यात आले होते. मात्र, आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने यातील दोन वॉर्ड पुन्हा पूर्ववत करण्यात येत आहेत. तर एक वॉर्ड कोरोना रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहे. दरम्यान, कोरोना काळामध्ये कोरोना रुग्णांना ऑक्सिजन आवश्यक असल्याने ऑक्सिजनयुक्त खाटांसह अद्ययावत खाटा रुग्णांना उपलब्ध करून देण्याकडे महापालिकेचा प्रयत्न होता. त्यानुसार महापालिका तसेच काही सामाजिक संस्थांकडून केईएम रुग्णालयाला ऑक्सिजनयुक्त खाटांचा पुरवठा केला. कोरोनामध्ये प्रत्येक रुग्णांमध्ये सामाजिक अंतर राखणे बंधनकारक असल्याने या खाटांमुळे मोठी सोय झाली होती.

- Advertisement -

नव्या खाटांना मोठी जागा लागत असल्याने वॉर्डमधील खाटांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे रुग्णांना दाखल करून घेण्यात अडचणी येत आहेत. ही अडचण दूर करण्यासाठी आम्ही काही छोट्या स्वरुपातील खाटा आणण्याचा विचार करत आहोत. त्या खाटा आणल्यास अधिक रुग्णांना दाखल करणे शक्य होईल.
– डॉ. संगीता रावत, अधिष्ठाता, केईएम रुग्णालय

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -