घरमुंबईव्ही.एन. देसाई रुग्णालयात होणार गुडघा प्रत्यारोपण

व्ही.एन. देसाई रुग्णालयात होणार गुडघा प्रत्यारोपण

Subscribe

येत्या ऑक्टोबरपर्यंत शस्त्रक्रियेसाठी सुरूवात करण्याचा विचार असल्याचे तिन्ही पालिका रुग्णालयाचे प्रमुख आणि वैद्यकीय संचालक डॉ. अविनाश सुपे यांनी ’आपलं महानगर’ ला सांगितलेे.

मुंबई : जसे वय वाढत जाते, तसे शरीरातील अवयवांच्या कामांमध्येही फरक जाणवतो. त्यात वृद्धांमध्ये गुडघे आणि कंबरेच्या खुब्याचा (हिप) आजार मोठ्या प्रमाणात असून यावर आता प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करणे सहज शक्य आहे. या शस्त्रक्रियेचा खर्च हा सर्वसामान्यांना परवडणारा नसतो. पण, आता सांताक्रूझ येथील पालिकेच्या व्ही.एन. देसाई रुग्णालयात लवकरच गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करणे शक्य होणार आहे. येत्या ऑक्टोबरपर्यंत शस्त्रक्रियेसाठी सुरूवात करण्याचा विचार असल्याचे तिन्ही पालिका रुग्णालयाचे प्रमुख आणि वैद्यकीय संचालक डॉ. अविनाश सुपे यांनी ’आपलं महानगर’ ला सांगितलेे.

गरीब रुग्णांना जिथे ते राहतात त्या जवळच्या रुग्णालयांमध्ये ही शस्त्रक्रिया उपलब्ध व्हावी असाही प्रस्ताव आहे. त्यामुळे पहिल्यांदा हा प्रयोग व्ही.एन देसाई या रुग्णालयात केला जाणार आहे. त्यानुसार, लवकरच पहिली शस्त्रक्रिया या रुग्णालयात केली जाणार असल्याची माहिती केईएम रुग्णालयाचे ऑर्थोपेडिक विभागाचे प्रोफेसर डॉ. श्रीनंद वैद्य यांनी दिली आहे. खासगी रुग्णालयात गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रियेचा खर्च हा सामान्यांना परवडणारा नसतो. खासगी रुग्णालयात या शस्त्रक्रियेचा खर्च १ लाख ८० हजार ते साडे सात लाखांपर्यंत असतो. पण, पालिकेच्या व्ही. एन. देसाई रुग्णालयात हीच शस्त्रक्रिया ५० ते ८० हजारांमध्ये केली जाणार आहे. त्यामध्येही रुग्णांना समाजसेवा संस्थांची मदत मिळवून दिली जाणार आहे, असेही डॉ. वैद्य यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

येत्या ऑक्टोबरपर्यंत ही शस्त्रक्रिया सुरू करण्याचा विचार आहे. ज्याचा फायदा मोठ्या प्रमाणात गरीब रुग्णांना होणार आहे. यासोबतच अनेक रुग्णालयांचा विस्तार करण्याचा प्रस्ताव आहे.  – डॉ. अविनाश सुपे, वैद्यकीय संचालक, पालिका रुग्णालय

ट्रान्सप्लांटमध्ये संसर्ग होऊ नये म्हणून हिपा फिल्टर ऑपरेशन थिएटर लागतात. त्याच प्रकारचे अत्याधुनिक वातानुकूलीत ऑपरेशन थिएटरही रुग्णालयात तयार झाले आहे. यासोबतच जे फॅलोशीप करणारे डॉक्टर्स असतात त्यांना स्टायपेंड देऊन ही सर्जरी त्यांना शिकवली जाणार आहे. ज्याचा फायदा मोठ्या प्रमाणात रुग्णांना होणार आहे. या शस्त्रक्रियेसाठी जी यंत्रसामुग्री वापरली जाते ती खासगी रुग्णालयासारखीच असणार आहे. ज्या कंपनीकडून इम्प्लांट घेतले जाणार आहेत त्यांना ही योग्य दरात देण्यासाठी सांगण्यात येणार आहे. – डॉ. श्रीनंद वैद्य, ऑर्थोपेडिक विभागाचे प्रोफेसर , केईएम रुग्णालय

Bhagyshree Bhuwadhttps://www.mymahanagar.com/author/bhagu/
भटकंती करायला खूप आवडतं. कोषात बसून राहणं अजिबात आवडत नाही. वडापाव प्रचंड आवडतो. जेवण तयार करण्याची आवड आहे. भरतनाट्यम शिकतेय. जीवनावर मनापासून प्रेम करते. नकार हा शब्द माझ्या शब्दकोशात नाही.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -