घरमनोरंजनज्येष्ठ कलाकार ऋषी कपूर यांना अखेरचा सलाम

ज्येष्ठ कलाकार ऋषी कपूर यांना अखेरचा सलाम

Subscribe

दिवंगत कलाकार ऋषी कपूर अनंतता विलीन झाले असून दक्षिण मुंबईतील चंदनवाडी स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचा मुलगा रणबीर कपूर यांनी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले असून यावेळी कपूर कुटुंबियांसह काही जवळचे मित्रपरिवार स्मशानभूमीत उपस्थित होते. बुधवारी मध्यरात्री मुंबईतील सर एच. एन. रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलमध्ये त्यांना अचानक त्रास होऊ लागल्याने दाखल केले होते. मात्र ३० एप्रिल रोजी सकाळी ८.४५ वाजता यांनी अखेरचा श्वास घेतला. ऋषी कपूर यांच्या निधनाची बातमी समजताच बॉलीवूडसह त्यांचे चाहते आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.

actor rishi kapoor passes away
ऋषी कपूर यांची पत्नी नीतू कपूर आणि आलिया भट यांच्या अश्रुंचा बांध फुटला. (Cortesy: Senior journalist Lipika Verma)

कपूर कुटुंबिय उपस्थित 

ऋषी कपूर यांच्या अंतिम दर्शनासाठी मोठे बंधू रणधीर आणि राजीव कपूर सह पुतणी करिना कपूर, रणधीर यांची पत्नी बबीता, सैफ अली खान, अभिषेक बच्चन, आलिया भट्ट यांच्यासह काही मोजके सेलिब्रिटी यावेळी उपस्थित होते. ऋषी कपूर यांची मुलगी रिधिमा ही दिल्लीत राहत असून वडिलांच्या निधनाची बातमी मिळतात त्यांनी लॉकडाऊनच्या परिस्थितीत परवानगी घेऊन रस्त्याच्या मार्गे मुंबईच्या दिशेने प्रवास सुरू केला आहे. दरम्यान, हिंदू पद्धतीनुसार ऋषी कपूर यांच्यावर अंत्यसंस्काराचा विधी पार पडला. यावेळी पत्नी नीतू सिंग यांना अश्रू अनावर झाले होते. तर इतरही उपस्थितांचे डोळे पाणावले होते.

- Advertisement -
actor rishi kapoor passes away
रणबीर कपूर आपल्या वडिलांना शेवटचं पाहताना. (Cortesy: Senior journalist Lipika Verma)

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -