घरमुंबईभिवंडीतील ४३ वर्ष जुनी इमारत पहाटे साडेतीनच्या सुमारास कोसळली

भिवंडीतील ४३ वर्ष जुनी इमारत पहाटे साडेतीनच्या सुमारास कोसळली

Subscribe

भिवंडीतील पटेल कम्पाऊंड परिसरात तीन मजली इमारत कोसळल्याची दुर्घटना घडली असून यामध्ये २० ते २५ जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे. घटनास्थळी एनडीआरएफची टीम दाखल झाली असून त्यांनी बचावकार्यास सुरूवात केली आहे. आतापर्यंतच्या बचावकार्यात २५ जणांना ढिगाऱ्याखालून काढण्यात एनडीआरएफच्या टीमला यश आले असून आठ जणांचा यात दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती ठाणे महानगरपालिकेच्या जनसंपर्क विभागाकडून सांगण्यात आली आहे. दरम्यान, एनडीआरएफच्या टीमने एका लहानग्याला ढिगाऱ्याखालून सुखरुप बाहेर काढले आहे.

- Advertisement -

भिंवडीतील पटेल कंपाऊंडमधील जिलानी अपार्टमेंट ही दुर्घटना घडली आहे. पहाटे तीन ते साडेतीन वाजताच्या सुमारास अचानक इमारत कोसळली. त्यानंतर सर्वत्र आरडाओरड आणि धावपळ सुरू झाली. पहाटे सगळे गाढ झोपेत असतानाच इमारत जमीनदोस्त झाली, त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

- Advertisement -

तब्बल ४३ वर्ष जुनी इमारत 

भिवंडीतील ही इमारत ४३ वर्ष जुनी असून या इमारतीत ४० घरे होती. तर एकूण १५० रहिवासी या तीन मजली इमारतीत राहत होते. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली २५ ते ३० जण अडकल्याची शक्यता वर्तवली जात असून ही धोकादायक इमारतीच्या यादीत नसल्याची माहितील भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेने दिल्याचे समजते. घटनास्थळी भिवंडी अ. केंद्राचे, ठाणे विभागाचे कर्मचारी, ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाचे १५ जवान आणि राष्ट्रीय आपत्ती दलाची (एनडीआरएफ) एक तुकडी म्हणजेच ३० जवान उपस्थित असून युद्ध पातळीवर बचावकार्य सुरू आहे.

हेही वाचा –

IPL 2020 : सुपर ओव्हरमध्ये DC चा KXIP वर उत्कंठावर्धक विजय!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -