घरमुंबईकोरोना काळात मेगाब्लॉकचे नॉनस्टॉप काम!

कोरोना काळात मेगाब्लॉकचे नॉनस्टॉप काम!

Subscribe

मध्य रेल्वेच्या कोरोना वॉरियर्सनी मेगा ब्लॉक दरम्यान ठाणे ते कल्याण जलद मार्गावर व तसेच हार्बर मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - चुनाभट्टी दरम्यान विविध  देखभाल दुरुस्तीची कामे पूर्ण केली आहे.

आधीच कोरोना विषाणूच्या संसर्गाने राज्यात चिंताग्रस्त वातावरण असतांना, दुसरीकडे रेल्वेचे कोरोना वारियर्स मात्र आपली कामगिरी या काळात चोखपणे बजावतांना दिसून येत आहे. रविवारी मध्य रेल्वेच्या कोरोना वॉरियर्सनी मेगा ब्लॉक दरम्यान ठाणे ते कल्याण जलद मार्गावर व तसेच हार्बर मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – चुनाभट्टी दरम्यान विविध  देखभाल दुरुस्तीची कामे पूर्ण केली आहे.

मध्य रेल्वे मार्गावर ठाणे -कल्याण जलद मार्गावर रविवारी देखभाल दुरूस्तीसाठी मेगा ब्लॉक घेण्यात आला होता. या दरम्यान  पारसिक बोगद्याजवळील २.६ ट्रॅक किमी.चे नूतनीकरण. तसेच नवीन इनोव्हेटेड एमएचएम मशीन (रेल रोड वाहन) द्वारा क्रॉसिंग ओव्हरच्या २८  स्लीपर्स बदलण्याचे  काम केलेे.  १.४ किमी. साध्या ट्रॅकचे बॅलॅस्ट टॅम्पिंगही करण्यात आले.  रूळ जोडण्यासाठी १६ ठिकाणी एल्युमिनो-थर्मिक वेल्डिंग देखील करण्यात आली.  हार्बर मार्गावर  जेसीबी मशीनद्वारे ६ वॅगन घाण काढली  आणि २ हजार घाणीच्या  बॅग्स इंजिनियरिंग वॉरियर्सद्वारे स्वतः लोड केल्या. याशिवाय तीन टॉवर वॅगनद्वारे १.३ किमी लांबीचे ओएचई  आणि ३ ओव्हरलॅपींगचे वार्षिक ओव्हरहाऊलिंग केले गेले.  या व्यतिरिक्त, विद्युत योद्धांद्वारे ओएचई देखभालची इतर कामे केली गेली.

- Advertisement -

एस अँड टी वर्क्स

दिवा आणि दातिवली दरम्यान कॉर्ड लाईनवर अभियांत्रिकी कामांच्या अनुषंगाने  २.६ किमी लांबीच्या ट्रॅकवर  ड्युमॅटीक मशीन पॅकींग, ट्रॅक लीड वायर्स व पॉईंट्सचे दोन सेट्स बदलण्याचे काम आणि ॲक्सल काउंटरचे डिसकनेक्ट करून पुन्हा जोडण्याचे काम सिग्नल व टेलिकम्युनिकेशन वॉरियर्सनी केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -