घरमुंबईमल्हार उलगडणार झेव्हियर्सचा दीडशे वर्षांचा प्रवास

मल्हार उलगडणार झेव्हियर्सचा दीडशे वर्षांचा प्रवास

Subscribe

मुंबईतील सर्व कॉलेज तरुणांना वेड लावणार्‍या मल्हार या फेस्टचे पडघम सध्या वाजू लागले आहेत.

मुंबईतील सर्व कॉलेज तरुणांना वेड लावणार्‍या मल्हार या फेस्टचे पडघम सध्या वाजू लागले आहेत. यंदाचे हे सेंट झेव्हियर्स कॉलेजचे हे १५० वे वर्ष असल्यामुळे आतापर्यंतचा हा इतिहास सर्वांसमोर मांडण्यात येणार आहे. यंदाची थीम अ टाइम टर्नर अशी ठेवण्यात आली आहे.

मल्हारची मजा वेगळीच 

या वर्षीचा मल्हार फेस्ट १५ ते १७ ऑगस्ट या तीन दिवसांच्या कालावधीत पार पडणार आहे. विविध स्पर्धांसोबत अनेक कॉन्फ्लुएन्समध्ये अनेक अनुराग कश्यप, आनंद ग्रोव्हर यांसारखे अनेक दिग्गजदेखील विद्यार्थ्यांसोबत संवाद साधणार आहेत.विद्यार्थ्यांना १ ऑगस्ट ते १३ ऑगस्ट या कालावधीत आपले पास घेता येतील. कॉलेज सुरू होताच मुंबईतील सर्व कॉलेजेस विविध फेस्टच्या तयारीला सुरुवात करतात. त्यात मल्हारची तर वेगळीच मजा असते.

- Advertisement -

 प्रसिद्ध अभिनेत्री डायना पेंटीची उपस्थिती 

या वर्षी बीट बॉक्सिंग, फेस पेंटिंग, डीजे इव्हेंट, सांस्कृतिक नृत्य, फोटोग्राफी, रांगोळी, गाणे या सांरख्या विविध स्पर्धांची चुरस स्पर्धकांमध्ये रंगणार आहे. या वर्षी बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आणि झेव्हियर्सची माजी विद्यार्थी डायना पेंटी हिची प्रमुख उपस्थिती असणार आहे. मल्हार हा फेस्ट फक्त स्पर्धेपुरता मर्यादित नसून यामध्ये विविध क्षेत्रांतील विभिन्न विषयांवर मत देखील मांडली जातात.

अनेक दिग्गजांची हजेरी

सेंट झेव्हियर्सच्या मल्हार फेस्टला आजवर अनेक दिग्गजांनी आपली हजेरी दर्शवली आहे.ज्यामध्ये ए. पी. जे. अब्दुल कलाम, दलाई लामा, शंकर महादेवन यांसारख्या दिग्गजांचा समावेश आहे. या वर्षी वाप्पाला बालाचंद्रन, आरिन अत्तारी, शाहीन मिस्त्री,डॉ अनुप सुरेंद्रनाथ, दुष्यंत दवे, वृंदा ग्रोव्हर या सारख्या काही दिग्गज हजेरी लावणार असल्याचे सांगितले जात आहे. यासोबतच गोदरेज ग्रुप ऑफ कंपनीचे मालक नादिर बुजोर्गी गोदरेज आणि प्रथम आंतरराष्ट्रीय सोशल नेटवर्किंग साईटचे निर्माते ऑर्कुट बुयुक्कोकटेन हे देखील येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -